'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत चोरीचे सत्य सर्वांसमोर येणार आहे.
स्वानंदी चोरी कोणी केली, हे सर्वांना सांगते.
समर आनंदची माफी मागण्यासाठी भर पावसात त्याच्या घराखाली जातो.
'वीण दोघांतली ही तुटेना' सुरू झाल्यापासून प्रेक्षक भरभरून मालिकेवर प्रेम करत आहे. काही दिवसांपूर्वी मल्लिकाच्या कटकारस्थानामुळे दोन जिवलग मित्रांमध्ये फूट पडते आणि त्यांची मैत्री तुटते. स्वानंदीच्या बर्थडे पार्टीत मल्लिका समरचा मित्र आनंद आणि त्याची बायको निकिता यांच्यावर चोरीचा आळ घेते. मल्लिका सोन्याचा हार चलाखीने निकिताच्या पर्समध्ये टाकते.
चोरीच्या प्रकरणामुळे समर आणि आनंदची मैत्री तुटते. समर आनंदला खूप वाईट बोलतो. ज्यामुळे आनंद खूप दुखावतो. त्यानंतर आनंद आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा करतो. मात्र स्वानंदी त्याला समजवून सांगते आणि खरं सत्य लवकर सर्वांसमोर येईल असा विश्वास देते. अशात आता 'वीण दोघांतली ही तुटेना' नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात स्वानंदी सर्व सत्य घरातील सदस्यांना सांगताना दिसत आहे. स्वानंदी ज्या बाईने निकिताच्या बॅगेत हार ठेवला असतो तिला घरातली सदस्यांसमोर घेऊन येते. हे सर्व पाहून समर खूप भावुक होतो आणि मित्राची माफी मागतो.
व्हिडीओत पाहू शकता की, समर सायकल घेऊन आनंदच्या घराखाली येतो. तेवढ्यात पाऊसही येतो. समर भर पावसात उभा राहून आनंदची हात जोडून माफी मागतो. म्हणते की, "आनंद प्लीज ये खाली... माझ्याशी बोल, मला भेट...आनंद मला माहितीये मी खूप मोठी चूक केलीये... आज ती चूक सुधारायलाच मी तुझ्याकडे आलोय... मी दोषी आहे... प्लीज मला माफ कर... खाली ये..."
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या प्रोमोला खास कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "समोर आलेलं सत्य, मैत्रीतील दुरावा संपवेल का?" प्रोमोवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. स्वानंदीचे प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7.30 ला पाहायला मिळते. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचे येणारे भाग खूपच रंजक असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.