LPG Shortage : धक्कादायक! जालन्यामध्ये ११० सिलिंडरची चोरी, एजन्सीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी डाव साधला

Jalna LPG Gas Cylinder Stolen: जालन्यात गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून ११० गॅस सिलिंडर चोरीला गेले. साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jalna LPG Gas Cylinder Stolen
Jalna LPG Gas Cylinder StolenSaam Tv
Published On
Summary
  • जालन्यात गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर चोरी

  • ११० गॅस सिलिंडर लंपास

  • साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरीला

  • पोलिसांकडून तपास सुरू

अक्षय पाटील, जालना

Jalna Utvad LPG Gas Cylinder Shortage Theft राज्यात एकीकडे नागरिकांना LPG गॅसचा तुटवडा जाणवत असून दुसरीकडे जालन्यातील गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून तब्बल ११० सिलिंडर लंपास केल्याची घटना घडली आहे. यामध्ये ९६ घरगुती गॅस सिलेंडरसह १२ व्यावसायिक गॅस सिलेंडर, २ पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या गॅस सिलिंडर टंचाईच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सध्या देशात सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे भारतात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. एका एका सिलिंडरसाठी सर्वसामान्य नागरिकांना धावपळ करावी लागत आहे.

Jalna LPG Gas Cylinder Stolen
KDMC Politics : ठाकरे सेनेचा धक्कादायक निर्णय! नवनिर्वाचित नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी

त्यातच जालना तालुक्यातील रामनगर येथील 'आनंद गॅस एजन्सी'चे उटवद शिवारातील गोडाऊन फोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपये किमतीचे ११० गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून ९६ घरगुती गॅस सिलेंडरसह १२ व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर , आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत.

Jalna LPG Gas Cylinder Stolen
Rain Alert : ऐन सणासुदीच्या तोंडावर धो धो पाऊस कोसळणार; ११ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद गॅस एजन्सी मध्ये यापूर्वी देखील चोऱ्या झालेले आहे आणि गॅस टंचाईच्या काळात मोठी चोरी झाल्याने प्रकरणाचा सर्वच बाजूने तपास केला जाईल अशी माहिती पोलिसांकडून समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com