Veen Doghantali Hi Tutena : घटस्फोटाची नोटीस पाहताच अधिरा बिथरली; थेट गेली टेरेसवर अन्..., 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट - VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Video :'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अधिरा स्वतःचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
Veen Doghantali Hi Tutena Video
Veen Doghantali Hi Tutena saam tv
Published On
Summary

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक वळण आले आहे.

समर-स्वानंदीच्या आयुष्यात एका मागोमाग संकटे येतात आहेत.

समरची बहीण अधिरा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करते.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत जात आहे. एकीकडे स्वानंदी व समरचे नाते आणि दुसरीकडे अधिरा- रोहन नात्यातील दुरावा. यामुळे मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा धक्कादायक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अधिरा जीव देताना दिसत आहे. समरची काकू मल्लिका अधिरा- रोहनच्या नात्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

मल्लिका काकू रोहन जेव्हा मकर संक्रांतीला अधिराच्या माहेरी येत असतो तेव्हा त्याचा अपघात घडवून आणते. त्यानंतर अधिराला घटस्फोटाचे पेपर देते. सांगते की, रोहनने घटस्फोटाचे पेपर पाठवले आहेत. प्रोमोमध्ये पहिल्या टप्प्यात स्वानंदी रोहनला समजावताना दिसत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात मल्लिका अधिराला पेपर देते आणि म्हणते की, "रोहनने डिव्होर्सची नोटीस पाठविली आहे..." हे ऐकताच अधिराला मोठा धक्का बसतो आणि ती बिथरते.

व्हिडीओत अधिरा रागाने टेबलवरील साहित्य बाजूला फेकताना दिसत आहे. तसेच ती रागात बंगल्याच्या टेरेसवर जाते आणि तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसते. जे पाहून घरातील सदस्यांना मोठा धक्का बसतो. ते तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात मल्लिका काकू समरसा फोन करून घरी बोलवतात. अधिरा रडत रडत "मला नाही जगायचे नाही" असे बोलताना दिसते.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या प्रोमो व्हिडीओला "अधिरा रोहनचं नातं वाचवू शकतील का समर आणि स्वानंदी?" असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते. 19 आणि 20 तारखेचा भाग विशेष असणार आहे. स्वानंदी- समर अधिरा आणि रोहनचे नातं कसं सुधारणार, दोघांना पुन्हा कसं एकत्र आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Veen Doghantali Hi Tutena Video
New Marathi Serial : प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येतेय नवीन मालिका; प्रोमोनं वेधलं लक्ष, मुख्य अभिनेत्री कोण? शोचे नाव आहे खूपच खास-VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com