मकर संक्रांतीच्या दिवशीच अघटित घडलं; ट्रक अपघातात सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत, शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Pune Rahatani Fatal Road Accident Involving Eicher Truck: मकरसंक्रांतीच्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. रहाटणी फाट्याजवळ घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Police officials inspect the accident spot near Kalevadi petrol pump where two sisters lost their lives after a speeding truck hit their bike.
Police officials inspect the accident spot near Kalevadi petrol pump where two sisters lost their lives after a speeding truck hit their bike.Saam Tv
Published On

पिंपरी चिंचवडच्या रहाटणी फाटा येथे आयशर ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना जोरदार धडक दिल्याने या दोन बहीणींचा जागीच अंत झाला आहे. ही घटना दुपारी काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोर पेट्रोल पंपाजवळ घडली. मकरसंक्रांती दिवशी दिवशी दोन्ही सख्ख्या बहीणींचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याने परीसरात शोक व्यक्त केला जात आहे.

ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय 24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय 20, रा. पुनावळे) अशी मृत्यू झालेल्या बहीणींची नाव आहेत. ट्रकचालक जितेंद्र निराले ( रा.खलघाट, जिल्हा धार, मध्यप्रदेश) काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे दोन्ही सख्या बहिणी असून मोठी बहीण ही ऍडव्होकेट आहे, तर दुसरी बहीण ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. सध्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील शिंदे कुटुंबाचा मिरची कांडपांचा व्यवसाय आहे. त्यांना या दोनच मुली होत्या. ऋतुजाणे आताच वकिलेचे शिक्षण पूर्ण केले होते. नेहा ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. बुधवारी ऋतुजा आणि नेहा कामानिमित्त गाडीवरुन चालल्या होत्या. काळेवडी येथे धनगर बाबा मंदिरासमोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर त्या खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com