Petrol Diesel Price: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरणार; वाचा सविस्तर

Petrol Diesel Price To Decrease in 2026: पेट्रोल डिझेलचे दर २०२६ मध्ये कमी होणार आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरु शकतात. परिणामी इंधनाचे दरदेखील कमी होतील.
Petrol Diesel Price Cut
Petrol Diesel Price CutSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलचे दर घसरणार

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यावर इंधनाच्या किंमती कमी होणार

कच्च्या तेलाच्या उत्पादन वाढ झाल्याने दरकपातीची आशा

सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. महागाईच्या जगात अनेक गोष्टींच्या किंमती वाढत आहेत.यामध्ये सोन्याचे दर, पेट्रोल डिझेलच्या भावात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. हे दर कमी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, असंही काहीही होत नाही. मात्र, आता सोन्याचे दर कमी होणार आहेत.

Petrol Diesel Price Cut
EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

जूनपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर घसरणार

२०२६ मघ्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होणार आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत तेलाचे दर कमी होतील परिणामी इंधनाचे दरदेखील कमी होती. जूनपर्यंत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ५० डॉलरपर्यंत येऊ शकतात. असा अंदाज स्टेट बँकेच्या रिसर्च रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आला आहे. २०२६-२७ मध्ये महागाई कमी होऊन रुपया मजबूत करण्यास आणि आर्थिक वाढ चालना मिळेल, असं अहवालात म्हटलं आहे.

स्टेट बँकेच्या अहवालानुसार, सौदी अरेबिया आणि रशिया या ओपेक प्लस देशांनी तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. सध्या भारतीय क्रूड ऑइलचे दर ६२.२० डॉलर बॅरलच्या आसपास आहे. हे भाव भविष्यात ५० डॉलरपर्यंत जातील.

Petrol Diesel Price Cut
Saving Scheme Interest Rate: कामाची बातमी! PPF, सुकन्या समृद्धीसह बचत योजनेचे नवीन व्याजदर जाहीर; वाचा सविस्तर

दर कपात होणार

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जर कच्च्या तेलात १४ टक्क्यांनी घट झाली तर त्याचा परिणाम इंधन विक्रीवर होईल. महागाईचा दर ३.४ टक्क्यांनी खाली येऊ शकतो.त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

Petrol Diesel Price Cut
Petrol Diesel Price: पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त होणार, कच्च्या तेलाचे दर १८ रुपये प्रति लिटर होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणारा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com