Saving Scheme Interest Rate: कामाची बातमी! PPF, सुकन्या समृद्धीसह बचत योजनेचे नवीन व्याजदर जाहीर; वाचा सविस्तर

Small Saving Scheme New Interest Rates: बचत योजनांवरील नवीन व्याजदर जाहीर झाले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
Saving Schemes
Saving SchemesSaam Tv
Published On
Summary

नवीन वर्षात सर्वसामान्यांना दिलासा

जानेवारी ते मार्च तिमाहीत बचत योजनांवरील नवीन व्याजदर जाहीर

व्याजदरात कोणताही बदल नाही

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवीन वर्षात बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. दर तीन महिन्यांनी बचत योजनांवरील व्याजदरात बदल केले जातात. दरम्यान, आता जानेवारी ते मार्च या तिमाहीत बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले आहेत.

Saving Schemes
RBI Rule: तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे? RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय; हे ४ नियम लवकरच बदलणार

१ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत विविध बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केली आहे. यावेळी व्याजदरात कोणताही बदल झाले नाहीत. व्याजदर कमी न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मागच्या तिमाहीत व्याजदरात कपात झाली होती. त्यामुळे यावेळीदेखील व्याजदर कमी होणार का अशी भीती होती.

जानेवारी ते मार्चपर्यंतचे नवीन व्याजदर जाहीर (Small Saving Scheme January-March New Interest Rate)

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जानेवारी-मार्च तिमाहीत पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना या योजनांसाठी नवीन व्याजदर जाहीर केले आहेत. या व्याजदरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Saving Schemes
New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, वाचा सविस्तर

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेनुसार, पीपीएफ योजनेत व्याजदर ७.१ टक्के असणार आहे. स्मॉल सेव्हिंग स्कीम आणि सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याजदर आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिटमध्ये व्याजदर ४ टक्के असणार आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत व्याजदर ६.७ टक्के ते ७.५ टक्के आहे. एनएससीमध्ये व्याजदर ७.७ टक्के तर किसान विकास पत्र योजनेत व्याजदर ७.५ टक्के आहे.

Saving Schemes
LIC Smart Pension Scheme : एलआयसीची भन्नाट स्कीम, प्रत्येक महिन्याला मिळणार ₹२०,००० पेन्शन; कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com