FD Rate
FD RateSaam Tv

FD Interest Rate: एफडी करायचा विचार करताय? या १० बँकेत मिळतंय सर्वाधिक व्याजदर

FD Interest Rate: जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या बँकेत तुम्हाला एफडीवर सर्वाधिक व्याजदर मिळते.
Published on

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. एफडीमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला व्याजदर मिळते. तुम्ही पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँकेत एफडी करु शकतात.

तुम्हाला वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळे व्याजदर मिळते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या बँकेत किती व्याजदर मिळते हे तुम्हाला सांगणार आहोत.

FD Rate
Small Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

एसबीएम बँकेत ३ वर्ष २ दिवस ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी एफडी केली तर तुम्हाला ८.२५ टक्के व्याजदर मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना ८.७५ टक्के व्याजदर मिळते.बंधन बँकेत ६०० दिवसांच्या एफडीवर ८ टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ८.५० टक्के व्याजदर मिळते.

डीसीबी बँकेत ३६ महिन्यांसाठी एफडी केली तर ८ टक्के व्याजदर मिळते. ज्येष्ठ नागरिकांना ८.५० टक्के व्याजदर मिळते.डॉयचे बँकेत २ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ७.७५ टक्के व्याजदर मिळते.

या बँकेत मिळते ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

येस बँकेत १८ महिने ते ३६ महिन्यांपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांना ७.७५ टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ८.२५ टक्के व्याजदर मिळते. आरबीएल बँकेत २४ महिन्यापासून ते ३६ महिन्याच्या कालावधीसाठी ७.० टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याजदर मिळते. आयडीएफसी बँकेत १ वर्षांपासून ते ५५० दिवसांच्या एफडीवर ७.५० टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याजदर मिळते.

FD Rate
PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवा

इंडसइंड बँकेत २ वर्ष ९ महिने ते ३ वर्ष ३ महिन्यांसाठी ७.५० टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याजदर मिळते. याचसोबत एचएसबीसी बँकेत ७३२ दिवस ते ३६ महिने या कालावधीत ७.५० टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याजदर मिळते.

FD Rate
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची आणखी एक योजना, उद्या होणार लाँच, वाचा बळीराजाला काय होणार फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com