
केंद्र सरकारने प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेची घोषणा केली होती. दरम्यान, आता ही योजना सुरु केली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना लाँच केली जाणार आहे.महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पार पडणार आहे. या कार्यक्रमात ३०० हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत,अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या योजनेत कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाच्या उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. एकूण १०० जिल्ह्यांची निवड केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील पालघर, रायगड, धुळे छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झालेली आहे.
केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणे, पिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे या उद्देशाने देशातील १०० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री धन– धान्य कृषी योजना, नैसर्गिक शेती व कडधान्य अभियान अंतर्गत अनेक योजनांचे उद्घाटन उद्या केले जाणार आहे. या सर्व योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. पीएम मोदी उद्या तब्बल ४२००० कोटींच्या योजनांचे अनावरण करणार आहे. यामध्ये पीएम किसान योजनेबाबत घोषणा होण्याचीदेखील शक्यता आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.