RBI Rule: तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे? RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय; हे ४ नियम लवकरच बदलणार

RBI Rule Change For Zero Balance Account: रिझर्व्ह बँकेने झिरो बॅलेंस अकाउंटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता तुम्हाला कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढता येणार आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
RBI Rule
RBI RuleSaam Tv
Published On
Summary

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

झीरो बॅलेंस अकाउंटच्या नियमांमध्ये बदल

आता कोणत्याही चार्जशिवाय काढता येणार एटीएममधून पैसे

रिझर्व्ह बँकेने झिरो बॅलेंस खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील कोट्यवधी लोकांचे झिरो बॅलेंस अकाउंट आहे. या खात्यात कोणताही प्रकारचा मिनिमम बॅलेंस ठेवावा लागत नाही. परंतु या अकाउंटवर अनेक चार्जेस लावले जातात. आता रिझर्व्ह बँकेने या अकाउंटधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बँक झिरो बॅलेंस अकाउंटवर अनेक चार्ज लावून ग्राहकांच्या अडचणीत वाढ करायचे. मात्र, आता हे नियम खूप सोपे करण्यात आले आहेत. आता या नवीन नियमांमुळे गावातील, लहान शहरातील ग्राहकांना डिजिटल पद्धतीने बँकिंग सेवा वापरता येणार आहे. डिजिटल पेमेंटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे.

RBI Rule
SIM Rule India: सिम कार्ड नसेल तर WhatsApp बंद करणार; केंद्राचा नवा फरमान, नियम कधी लागू होणार?

कोणत्याही चार्जशिवाय वापरता येणार डिजिटल सेवा

याआधी बँका UPI, IMPS किंवा NEFT ला पैसे काढण्यासाठी वापरले जात असल्याचे मानत होत्या. चार्ज लावत होते. यामुळे ग्राहकांना खूप अडचणी यायच्या. आता यानंतर कोणतेही डिजिटल ट्रान्झॅक्शन हे पैसे काढणारे मानले जाणार नाही. त्यामुळे झिरो बॅलेंस खात्यांमधील डिजिटल पेमेंट हे मोफत आणि अमर्यादित असणार आहे.

पैसे काढण्यासाठी शुल्क नाही (Zero Balance Account Rule)

ग्राहकांना आता कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढता येणार आहे. याआधी पैसे काढण्यावर चार्ज लागत होते. नवीन नियमांनुसार, बँकांना दर महिन्याला किमान ४ वेळा मोफत रोख रक्कम काढण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला चार्ज लागणार नाहीये. यामुळे जे लोक रोख रक्कम वापरतात त्यांना फायदा होणार आहे.

डेबिट कार्ड वापरल्यामुळे सूट मिळणार आहे. याआधी बँका वार्षिक शुल्क किंवा रिन्यूअल फी आकारत होते. मात्र, आता ही सुविधा मोफत असणार आहे. आता झिरो बॅलेंस अकाउंटसाठी कोणत्याही वार्षिक शुल्काशिवाय पैसे काढता येणार आहेत.

RBI Rule
Bank Rule Change: १ नोव्हेंबरपासून बँकेचे नियम बदलणार, तुमच्यावर थेट परिणाम, वाचा सरकारने कोणता घेतला निर्णय

चेकबुक आणि पासबुकचे नियम बदलले

पासबुक आणि चेकबुकच्या नियमात बदल केले आहेत. ग्राहकांना दरवर्षी २५ पानांचे चेकबुक मोफत मिळणार आहे. याचसोबत बँकांना पासबुकदेखील मोफत द्यावे लागणार आहे. याआधी यासाठी बँका शुल्क आकारत होत्या.

आता शून्य बॅलेंस खात्यांमध्ये ठेवींवर कोणतीही मर्यादा राहणार नाही. पूर्वी याबाबत निर्णय होते. आता ग्राहक त्यांच्या मर्जीनुसार पैसे ठेवू शकतात. हे नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत.

RBI Rule
Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com