Bank Rule Change: १ नोव्हेंबरपासून बँकेचे नियम बदलणार, तुमच्यावर थेट परिणाम, वाचा सरकारने कोणता घेतला निर्णय

Bank Rule Change From 1st November 2025: अर्थ मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या नॉमिनीच्या नियमात बदल केले आहेत. आता तुम्हाला चार नॉमिनी लावता येणार आहे.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On
Summary

अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय

बँकेच्या नियमांत केला मोठा बदल

आता चार नॉमिनी ठेवता येणार

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता बँकेच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. आता तुम्हाला एक दोन नव्हे तर चार नॉमिनी जोडता देणार आहे. अर्थमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Bank Rule Change)

१ नोव्हेंबर २०२५ पासून हे नवीन नियम लागू होणार आहे. तुम्हाला चार नॉमिनी जोडण्याची परवानगी मिळणार आहे.यामुळे ग्राहकांना खूप जास्त फायदा होणार आहे. ग्राहकांची पैसे सुरक्षित राहतील याचसोबत सर्व प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी हा निर्णय जारी केला.

Rule Change
RBI Rule: फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

अर्थ मंत्रालयाने काय सांगितलं?

अर्थ मंत्रालयाने बँकिंग कायदा (दुरुस्ती),२०२५ मध्ये महत्त्वाचे कलम लागू केले. हे पुढच्या महिन्यापासून लागू होतील. यामध्ये तुम्ही आता बँक अकाउंट, लॉकर किंवा इतर वस्तू ज्या लॉकरमध्ये ठेवल्यात त्यांच्यासाठी नॉमिनी लावू शकतात. तुम्हाला याआधी फक्त एक किंवा दोन नॉमिनी लावण्याची परवानगी होती. त्यानंतर आता हा नियम बदलला आहे. तुम्ही ४ वारसदार लावू शकतात. बँकिंग कायद्यातील काही नियम लागू झाले आहेत. काही नियम १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

नवीन नियम काय आहे? (Bank Nominee Rule Change)

नवीन नियमानुसार तुम्ही चार नॉमिनी निवडू शकतात. जर तुम्ही पहिला नॉमिनी निवडला तो व्यक्ती जर हयात नसेल तर दुसरा व्यक्ती आपोआप नॉमिनी होईल. तेच ग्राहक स्वतः हे पैसे चार नॉमिनीमध्ये किती वाटायचे हे ठरवू शकतात. याचा निर्णय स्वतः ग्राहक किंवा खातेधारक घेईल.

लॉकरचे नियम

सेफ कस्टडी आणि लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी क्रमाने नॉमिनीची अनुमती असेल.म्हणजे पहिल्या नॉमिनीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला अधिकार मिळेल. यामुळे बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता राहिल. ग्राहकांना त्यांच्या मर्जीने वारसदार ठरवता येईल.

Rule Change
EPFO 5 Rule News : आता पेन्शन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, EPFO चे हे ५ नवे नियम माहिती आहेत का ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com