RBI Rule: फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

RBI EMI Rule: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता जर तुम्ही एखाद्या वस्तूचा ईएमआय भरला नाही तर तुमची वस्तू बंद होणार आहे.
RBI
RBISaam Tv
Published On

सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी घेतानादेखील सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीदेखील खूप वाढत आहेत. या परिस्थितीत अनेकजण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ईएमआयवर खरेदी करतात. दरम्यान, आता आरबीआय लवकरच नवीन नियम लागू करणार आहे.

RBI
Government Scheme: पशुपालनाचा व्यवसाय करायचाय,पण गोठा नाहीये; सरकार देणार गाई-म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

आता ईएमआयवर मोबाईल, टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. जर तुम्ही ईएमआय भरला नाही तर तुमचा मोबाईल, टीव्ही बंद होणार आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये चर्चा सुरु आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये हा नियम आहे. जर तुम्ही एखाद्या वस्तूचा ईएमआय भरला नाही तर तुमची वस्तू बंद होते. जर तुम्ही कारचा ईएमआय भरला नाही तर कार सुरू होत नाही. तसाच नियम भारतात लागू होण्याची शक्यता आहे.

भारतात हा नियम कसा लागू होणार?

आरबीआय हा नियम मोबाईल, स्मार्ट टीवी, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर लागू करण्याची शक्यता आहे. यामध्ये ईएमआयवर कोणतीही वस्तू खरेदी केली तर तुमच्या फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल केले जाईल. जेव्हा तुम्ही ईएमआय भरणार नाही तेव्हा तुमची वस्तू बंद होणार आहे.

RBI
RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! चेक क्लिअरन्सच्या नियमांत केला बदल

वैयक्तिक माहितीचं काय होणार?

या नियमामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीला कोणत्याही प्रकारची हानी पोहचणार नाही. तुमची सर्व माहिती सुरक्षित असणार आहे.

जर हा नियम लागू झाला तर डिफॉल्ड आणि फ्रॉडच्या घटना कमी होईल. याचसोबत बँकांनादेखील फायदा होणार आहे. जर तुमची वस्तू बंद पडली तर युजर्संना अडचणी होती. परिणामी ते ईएमआय भरतील.

RBI
RBI Repo Rate: दिवाळीआधी सर्वसामान्यांना खुशखबर मिळणार! होम, कार लोन पुन्हा स्वस्त होणार, SBI कडून मिळाले संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com