RBI Repo Rate: घराचा ईएमआय स्वस्त होणार! RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटमध्ये कपात

RBI Repo Rate Decreases: रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे.
RBI Repo Rate
RBI Repo RateSaam Tv
Published On

रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. रेपो रेट (Repo Rate) आता ६ टक्के झाला आहे. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. आज पतधोरण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे.

RBI Repo Rate
Bank Holidays: १३, १४ अन् १५ मार्चला बँकांना सुट्टी; वाचा RBI च्या सुट्ट्यांची यादी

RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा काय म्हणाले?

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीचा विचार करता, बाजारात गुंतवणूक वाढवणे हा या कपातीमागील मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल. ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त होऊन खरेदीला प्रोत्साहन मिळेल. सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल, परंतु महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय पुढील काळातही सतर्क राहील. दरम्यान, रेपोट रेटमध्ये कपात केल्यानंतर बँका त्यांच्या कर्ज व्याजदरात लवकरच बदल करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

RBI Repo Rate
Bank Holidays: मार्च महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

टॅरिफबाबत काय म्हणाले संजय मल्होत्रा?

सध्या अमेरिकेने भारतावर २६ टक्के टॅरिफ लागू केला आहे. याबाबतही संजय मल्होत्राने माहिती दिली आहे. जास्त टॅरिफमुळे देशाच्या निर्यातीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.टॅरिफमुळे निर्माण झालेले अनिश्चितता देशाच्या विकासाच्या दरावर मर्यादा आणू शकते. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवरील परिणाम देशाच्या आर्थिक वाढीलाही अडथळा आणू शकते, असं त्यांनी सांगितलं.

रेपो रेटमध्ये कपात केल्याने कर्जाचा हप्ता किती होणार कमी?

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर बँकांच्या लोनचा हप्ता ठरवला जातो. जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर कर्जाचा हप्ता आपोआप कमी होतो. तीन महिन्यांपूर्वी पतधोरण बैठकीतदेखील रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. रेपो रेट ६.२५ टक्के झाला होता. दरम्यान, आता या रेपो रेटमध्ये आणखी कपात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आता रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यानुसार बँका आपल्या लोनवरील व्याजदर कमी करतील. प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे असते. त्यानुसार तुमचा ईएमआय कमी होणार आहे.

RBI Repo Rate
Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना, फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; मिळतोय जबरदस्त रिटर्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com