Share Market: ट्रम्प यांच्या निर्णयामुळे शेअर मार्केट धडाम; सध्या गुंतवणूक करणे फायद्याचे की धोक्याचे? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Share Market Investment Tips: शेअर मार्केटमध्ये सध्या खूप जास्त पडझड सुरु आहे. अमेरिकेने लावलेल्या टैरिफ कराचा हा परिणाम आहे. सध्या म्युच्युअल फंड एसआयपीमधील गुंतवणूक ही फायद्याची ठरु शकते, असं तज्ञांनी सांगितलं आहे.
Share Market:
Share Market:Saam Tv
Published On

अमेरिकेने भारतावर टैरिफ कर लावल्यानंतर आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली गेली आहे. अमेरिकेच्या निर्णयानंतर शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अनेकांचे लाखो रुपये बुडाले. काल शेअर मार्केटमध्ये खूपच पडझड पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांचे तर टेन्शन वाढले आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न पडला आहे.

Share Market:
Share Market : सलग १० व्या दिवशी शेअर बाजारात पडझड; डोनाल्ड ट्रम्प यांचा इफेक्ट कायम, आज कोणते शेअर ठरले टॉप गेनर्स?

सध्याच्या शेअर मार्केटच्या स्थितीवरुन म्युच्युअल फंड एसआयपी सुरु करण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले आहे. परंतु गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी असाही सल्ला तज्ञांनी दिला आहे.

याबाबत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूकदार स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार यांनी दिली आहे. जागतिक स्तरावर बाजारपेठा वाढत्या अस्थिरतेतून जात आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा असा परिणाम होईल, अशी कल्पनादेखील नव्हती. त्यामुळे सध्या वेट अँड वॉच अशी भूमिका सर्वात उत्तम ठरणार आहे.

सध्याच्या शेअर मार्केटवर मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष विष्णूकांत उपाध्याय यांनी सांगितले की, व्यापार शुल्काच्या अनिश्चितेमुळे बाजारातील अस्थिरता येत्या काही काळात कायम राहण्याची शक्यता आहे. सध्याची गुंतवणूक ही उत्तम ठरणार आहे.

व्हीएसआरके कॅपिटलचे संचालक स्वप्नील अग्रवाल यांनी सांगितले की, मंदीच्या सतत्या भीतीमुळे भारतीय गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. घाबरु नका सध्याच्या परिस्थितीत संतुलित दृष्टिकोन राखणे गरजेचे आहे, याबाबत न्यूज १८ ने माहिती वृत्त दिले आहे.

या तीन गोष्टी लक्षात ठेवा

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसजचे विजयकुमार यांनी या ३ गोष्टी लक्षात ठेवायला सांगितले आहे.

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रम्प यांचे हे आयात शुल्क जास्त काळ टिकणार नाही.

  • भारताची अमेरिकेला निर्यात होणारी जीडीपीची टक्केवारी २ टक्के आहे. त्यामुळे भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे. भारताच्या विकासावर याचा फार परिणाम होणार नाही.

  • भारत अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार करारावर काम करत आहे.हा करार यशस्वी होण्याची शक्यता आहे.ज्यामुळे भारतात जास्त परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

Share Market:
Share Market Crash : जगाला मंदीनं ग्रासलं, बाजारपेठांना दणका; लाखो बेरोजगार गुंतवणूकदारांना कोटींचा फटका,VIDEO

म्युच्युअल फंड एसआयपी

सध्या दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी निफ्टी ज्युनिअर (निफ्टी नेक्स्ट ५०), निफ्टी ईटीएफ हे चांगले पर्याय आहे.सध्या या म्युच्युअल फंडमध्ये अस्थिरता आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकीसाठी हा चांगला ऑप्शन आहे. यामध्ये काही काळाने स्थिरता येईल, असं स्वप्नील यांनी सांगितलं आहे.

Share Market:
Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना, फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; मिळतोय जबरदस्त रिटर्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com