
शेअर बाजारात सात दिवसानंतर तेजीला ब्रेक लागला आहे. फार्मा ते रियल्टी सेक्टर्सच्या शेअरमध्ये १ टक्क्याहून अधिक घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टी ते निफ्टी इंडेक्स लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स ७२८ अंकांनी घसरून ७७२८८ वर स्थिरावला. निफ्टी १८१ अंकांनी घसरून २३,४८६ वर बंद झाला.
बँक निफ्टी ३९८ अंकांनी घसरला. बीएसई बीएसई सेन्सेक्सच्या ३० शेअरपैकी ४ शेअरमध्ये तेजी दिसली. तर २६ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. एनटीपीसीच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. झोमॅटो, टेक महिंद्रा आणि अॅक्सिस बँक ३ टक्क्यांनी घसरला. इंडसइंड बँकचे शेअर ३ टक्क्यांनी घसरला.
१. गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेच्या टॅरिफची भीती कायम आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २ एप्रिलपासून टॅरिफचा प्रभाव राहणार नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे अमेरिका आयातशुल्क आणखी वाढवणार असण्याची शक्यता आहे.
२. मागील सात सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स ५.७ टक्क्यांनी वधारला. मात्र, शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाली.
३. कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. कारण अमेरिकेने व्हेनेजुएला आणि इराणच्या तेल निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
४. बँकिंग, फायनान्स आणि आयटी क्षेत्रातील शेअरचा बाजारावर दबाव आहे. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकने सेन्सेक्सच्या ४४० अंकाच्या घसरणीत योगदान दिलं.
५. यूएस डॉलर इंडेक्स ०.१२ टक्क्यांनी वाढून १०४.३१ वर पोहोचला.
तेजस नेटवर्क ६ टक्क्यांनी घसरून ६१८ वर बंद झाला. inox wind ५ टक्क्यांनी घसरून १५९ वर पोहोचला. RITES 5 टक्क्यांनी घसरून २३४ रुपयांवर बंद झाला. बीएसई ३.८० टक्के, इरेडा ४ टक्के, मॅक्स हेल्थकेअर ४ टक्के, आरईसीएल ३.८७ टक्के , एनटीपीसी ३.३५ टक्के आणि झोमॅटो ३ टक्क्यांनी घसरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.