Share Market Crash : जगाला मंदीनं ग्रासलं, बाजारपेठांना दणका; लाखो बेरोजगार गुंतवणूकदारांना कोटींचा फटका,VIDEO

Share Market Crash update : जगभरातले शेअर बाजार कोसळलं आहे. त्यामुळे आता मंदीची भीती वर्तवली जात आहे. अमेरिकन बाजारात मंदीची शक्यता ६० टक्क्यांनी वाढल्याचं अहवाल सांगण्यात येतेय.
Share Market today
Share MarketSaam tv
Published On

जगभरातले शेअर बाजार कोसळल्याने आता मंदीची भीती वर्तवली जातेय.. भारतीय आणि अमेरिकन बाजारात मंदीची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं अहवालात सांगण्यात आलंय.. ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरा दिलाय. त्यामुळे पुढचा मोठा धोका मंदीचा दिसतोय.काय घडतंय ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरमुळे पाहूया.

22 जानेवारी 2008 -'ब्लॅक फ्रायडे'

जगाला मंदीनं ग्रासलं...बाजारपेठांना जबर फटका लाखो बेरोजगार गुंतवणुकदारांना कोटींचा फटका

7 एप्रिल 2025 - 'ब्लॅक मंडे'

'ब्लॅक मंडे' - एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 16 लाख कोटींचा चुराडा, भारतीय रुपयाही घसरला, 2 दिवसांत जागतिक बाजारपेठेत 5 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

“उष:काल होता होता, काळरात्र झाली” अशी काहीशी परिस्थिती ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापारयुद्धामुळे देशात निर्माण झाली आहे. देशांतर्गत शेअर आणि कमॉडिटी बाजार असो किंवा करन्सी एक्सेंज ..खरं तर सुरुवात चांगली झाली होती मात्र याच चांगल्या वातावरणावर परकीय संकट आले. ‘ट्रम्प’ नावाचं....

Share Market today
Bitcoin fall : टॅरिफ बॉम्बमुळे जगात हाहाकार, शेअर बाजारच नाही Bitcoin ही पडले, आता किती झाली किंमत?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या करयुद्धातून निर्माण झालेलं जागतिक व्यापारयुद्ध...ट्रम्प यांनी अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सर्व देशांवर 10 ते 46 टक्क्यांपर्यंत आयात कर लावल्याची घोषणा केली आणि जागतिक बाजारात वादळ आलं. त्यानंतरच्या 48 तासांत जागतिक शेअर बाजार कसा आपटला पाहूया...

Share Market today
Share Market Today : डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स-निफ्टी धडाम; कोणते शेअर ठरले टॉप लुजर्स?

जागतिक बाजारही धडाम -

देश बाजार घसरण

----------------------------------------------------------

अमेरिका नॅसडॅक 5.82%

चीन शांघाय 6.50%

जपान निक्केई 6%

कोरिया कोस्पी 4.50%

हाँगकाँग हँग सेंग 10%

तैवान TSX 9.68%

ट्रम्प यांच्या व्यापारकराने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजार उघडताच सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला. निफ्टीमध्येही 1000 अंकांची घसरण झाली. आता पुढे काय होणार हीच भीती त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आहे.

बाजार धडाम, काय होणार परिणाम?

गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा

अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती

जगभरात महागाई वाढण्याची भीती

कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची भीती

नोकऱ्या कमी होतील, पगारवाढ होणार नाही

Share Market today
Fadnavis Government : फडणवीस सरकारने 100 दिवसांत जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? पाहा व्हिडिओ

ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरा दिला आहे. मोठा धोका आता मंदीचा दिसतो. मात्र गुंतवणूकदांरांना म्हणूनच साम टीव्ही आवाहन करतंय...

गुंतवणूकदारांना आवाहन

बाजाराची स्थिती स्पष्ट दिसल्याशिवाय गुंतवणूक करू नका

गुंतवणूकदारांनी संयम बाळगावा

आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका

दीड-दोन वर्षानंतर बाजार पुन्हा उभारी घेण्याची शक्यता

दरम्यान 50 देशांनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधलाय.. या चर्चेनंतर काही बाबी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. ट्रम्प अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात. अमेरिकेतील 50 राज्यांमध्येही आंदोलने होतायत..मात्र 2008 सालच्या जागतिक मंदीचा थेट फटका तुलनेनं भारताला बसला नव्हता. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांनी भारतीय बाजार सावरला होता. त्यामुळे आताही नवीन सकारात्मक व्यवस्था प्रत्यक्षात येण्यासाठी काही महिने जावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com