Bank Holidays: १३, १४ अन् १५ मार्चला बँकांना सुट्टी; वाचा RBI च्या सुट्ट्यांची यादी

Bank Holidays on Holi: होळीच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहे. १३, १४ आणि १५ मार्च रोजी वेगवेगळ्या शहरांमध्ये बँका बंद असणार आहेत.
Bank Holidays
Bank HolidaysSaam Tv
Published On

देशभरात १३ आणि १४ मार्च रोजी होळी साजरी करण्यात येणार आहे. १३ तारखेला होळी तर १४ तारखेला धुलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद असणार आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या तारखांना सुट्टी असणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. यावर्षी १३ आणि १४ तारखेला होळी साजरी केली जाणार आहे.१३ मार्च रोजी होलिका दहन असणार आहे. त्यामुळे उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत. या दिवशी सर्व क्रोध, राग, वाईट गोष्टी या होळीत जाळून टाकतात.

Bank Holidays
Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत एकदाच करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळतील ५,५५० रुपये

१४ मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात १४ मार्च रोजी धुलिवंदन साजरा केलं जाणार आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावतात. या दिवशी गुजरात, ओडिशा, चंदीगढ, सिक्कीम, आसाम, हैदराबाद, अरुणाचल प्रदेश, गोवा, बिहार, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.

१५ मार्च रोजी या ठिकाणी बँका बंद

१५ मार्च २०२५ हा तिसरा शनिवार आहे. त्यामुळे बँका उघडणार आहेत. परंतु तरीही काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. १५ मार्च रोजी त्रिपुरा, ओडिशा, मणिपुर या ठिकाणी सुट्टी असणार आहे. मणिपुरमध्ये १५ मार्चला याओसांग हा सण असल्याने सुट्टी असणार आहे.

Bank Holidays
SBI Scheme: स्टेट बँकेचं महिलांसाठी खास गिफ्ट! आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार लोन

उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये बँका बंद राहणार आहेत. १३ आणि १४ मार्च हे दोन दिवस या राज्यांमध्ये पब्लिक हॉलिडे जाहीर करण्यात आले आहे. या काळात जरी ऑफलाइन ब्रँच बंद असल्या तरीही इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन बँकिंग सेवा सुरु असणार आहे.

Bank Holidays
Bank Holidays: मार्च महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com