Manasvi Choudhary
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
यंदा होळी १४ मार्च २०२५ ला सर्वत्र साजरी होणार आहे.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना होळी या सणाची उत्सुकता आहे.
होळीच्या दिवशी होलिक दहन आणि दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाते.
होळी हा सण वाईटावर मात करून विजय मिळवण्याचा उत्सव आहे.
भगवान कृ्ष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचा हा उत्सव आहे.
हिंदू पौराणिर कथेनुसार, राधा अत्यंत गोरी असल्याने कृष्ण गडद वर्णाचे होते यामुळे रंगातील फरकामुळे राधा आपल्याला स्विकारेल की नाही अशी भिती होती.
हे कृष्णाने यशोदाला सांगितल्यावर यशोदाने गंमतीमध्ये राधाच्या चेहऱ्यावर रंग लावून हा मतभेद दूर करावा असा सल्ला दिला.
तेव्हा कृष्णाने राधाला गुलाल लावला तेव्हापासून होळी या उत्सवाला सुरूवात झाली.