भारत-रशिया संबंधांना नवी गती; आरोग्य-शिक्षणासह अनेक निर्णायक करार|VIDEO

India Russia Bilateral Agreements 2025: भारत आणि रशियामध्ये आरोग्य, शिक्षण, खतं, रसायनं, शिपिंग व सागरी क्षेत्रातील अनेक निर्णायक करार झाले. २०३० आर्थिक रोडमॅपवर सहमती मिळाल्यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला नवी गती मिळणार आहे.

भारत आणि रशियामध्ये आज अनेक निर्णायक करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आरोग्य, शिक्षण, खतं, रसायनं, शिपिंग आणि ट्रान्सपोर्ट यांसह सागरी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार दोन्ही देशांत पार पडले. या द्विपक्षीय चर्चेत भारत-रशिया संबंध अधिक दृढ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे विशेष आभार मानले. जागतिक आव्हानांच्या काळातही भारत-रशिया मैत्री ध्रुवताऱ्यासारखी स्थिर राहिल्याचं मोदींनी यावेळी नमूद केलं. तसंच २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्य रोडमॅपवरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या भेटीमुळे आगामी काळात द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्याला नवी दिशा मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com