Cancer Vaccine : रशिया कॅन्सरला हरवणार, प्री-क्लिनिकल ट्रायल्समध्ये लस १०० टक्के यश, वाचा किती असेल किंमत

Russian Cancer Vaccine Development : कर्करोगावरील लसीची रशियात चाचणी सुरू असून त्यात यश मिळत आहे. बरे होण्याच्या प्रक्रियेत मंद गतीने का होईना पण सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
Russian Cancer Vaccine Development
Russian Cancer Vaccine DevelopmentFreepik
Published On

कर्करोग हा सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजाराशी लढणे जवळजवळ अशक्यच आहे. जगात लाखो लोक कर्करोगाने त्रस्त आहेत. अशात एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. गेला काही काळ रशियामध्ये फेडरल मेडिकल अँड बायोलॉजी एजन्सी (FMBA) कडून कर्करोगावरील लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रायोगिक लसीची प्रीक्लिनिकल चाचणी करण्यात आली. या चाचणीत लस सुरक्षित आणि उच्च परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.

Russian Cancer Vaccine Development
Breast cancer recurrence: 20% महिलांना ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याची असते शक्यता; 'या' उपायांनी धोका कमी करता येणं शक्य

फेडरल मेडिकल अँड बायोलॉजी एजन्सी (FMBA) च्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान झालेल्या ईस्टर्न इकॉनॉमिक फॉरमच्या बैठकित या चाचणीबद्दल बोलताना सांगितले की, अनेक वर्षांपासून लसीवर संशोधन सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते आणि त्यांची टिम या लसीची प्रीक्लिनिकल चाचणी करत होते. आता अथक प्रयत्नांनंतर त्यांना यश मिळाले आहे. ही लस आता वापरासाठी पुर्णपणे तयार आहे. पण या लसीला अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. ३००,००० रुबव म्हणजेच २.५ लाख रुपये इतकी असू शकते.

यावर भर देत एफएमबीए प्रमुखांनी सांगितले, वारंवार केलेल्या प्रीक्लिनिकल चाचणीच्या निकालांमध्ये अधिक लक्षणीय परिणामकारकता दिसून आली. कर्करोगाच्या ६० ते ८०% प्रकरणांमध्ये ट्यूमरचा आकार कमी होताना दिसून आला आणि आजार बरा होण्याच्या प्रक्रियेत मंद प्रगती दिसून आली. याशिवाय मृत्यूची शक्यता कमी झाल्याचे देखील दिसून आले आहे. अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर ही लस जगभरात उपलब्ध होण्याची शक्याता वर्तवली जात आहे. या लसीच्या एका डोसची किंमत

Russian Cancer Vaccine Development
Cancer Symptoms: बहुतेक वेळा कॅन्सर शेवटच्या टप्प्यातच का सापडतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

वेरोनिका यांच्या मते, ही लस प्रथम कोलोरेक्टल कर्करोगाविरूद्ध वापरली जाईल. ग्लिओब्लास्टोमा आणि मेलेनोमाच्या काही प्रकारांसाठी लसींवर संशोधन सुरू आहे. ज्यामध्ये ऑक्युलर मेलेनोमाचा समावेश आहे, जे विकासाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. याव्यतिरिक्त अमेरिकन सोसायटीनुसार, सध्या काही प्रोटेस्ट आणि मूत्राशय कर्करोगांसाठी लसी उपलब्ध आहेत. तसेच अधिक संशोधने केली जात आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

Russian Cancer Vaccine Development
Stomach cancer symptoms: पोटाचा कॅन्सर की अ‍ॅसिडिटी? दोन्ही समस्यांमधील फरक कसा ओळखाल, शरीरातील बदलांकडे लक्ष द्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com