Cancer Symptoms: बहुतेक वेळा कॅन्सर शेवटच्या टप्प्यातच का सापडतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Cancer Awareness : कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात साध्या आजारांसारखी लक्षणे दाखवतो. वजन घटणे, थकवा, गाठ तयार होणे याकडे दुर्लक्ष धोकादायक ठरते. वेळेवर तपासणी केल्यास बरे होण्याची शक्यता वाढते.
Cancer Awareness
Cancer Symptomsgoogle
Published On

कर्करोगाचे प्रमाण सध्या सगळ्या वयोगटात झपाट्याने वाढत चालले आहे. हा एक असा आजार आहे ज्याचे नावच लोकांना घाबरवते. कारण या आजाराचा शेवट थेट मृत्यूने होतो. बहुतेक वेळा त्याची लागण शेवटच्या टप्प्यातच होते. त्या वेळी परिस्थिती अत्यंत बिकट असते. तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात काही लक्षणे दिसतात.

मात्र ती साध्या आजारांसारखीच असल्याने लोक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टर देखील त्यांना किरकोळ त्यावर उपचार करतात. अशा वेळी रोग शांतपणे वाढत जातो आणि गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतरच कर्करोग होतो.

कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे साधारणपणे वजन अचानक कमी होणे, थकवा जाणवणे, दीर्घकाळ वेदना होणे, शरीरात कुठेतरी गाठ तयार होणे, अंगावर जखमा किंवा भूक न लागणे अशी असतात. परंतु ही लक्षणे दुर्लक्षित करणे धोकादायक ठरु शकते. जर ती दीर्घकाळ टिकून राहिली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Cancer Awareness
Realme 15T 5G लॉन्च ऑफर्ससह भारतात उपलब्ध; जाणून घ्या किंमत

तज्ज्ञांच्या मते, नियमित आरोग्य तपासणी करणे हा आजारावर मात करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. वेळेवर पीईटी-सीटी स्कॅन किंवा इतर तपासण्या करून कर्करोग लवकर आढळू शकतो. योग्य वेळी लागण झालेली कळले तर उपचारांचा परिणामही अधिक चांगला होतो. बरे होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लक्षणे कितीही किरकोळ वाटली तरी त्याकडे गांभीर्याने पाहणे, तसेच नियमित हेल्थ चेकअप करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Cancer Awareness
Fitness After 40 : चाळीशी ओलांडली? मग फिटनेस तपासण्यासाठी फक्त ४ व्यायाम ठरतील बेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com