New cancer cure found: अखेर कॅन्सरवर उपचार मिळाले! थेट कर्करोगाच्या ट्यूमरला नष्ट करणार 'ही' थेरेपी

New treatment for cancer tumors: एका नव्या थेरपीने थेट कर्करोगाच्या गाठींवर हल्ला करून त्या नष्ट करण्यात यश मिळवले आहे. ही थेरपी भविष्यात कर्करोगावरचा रामबाण उपाय ठरू शकते, असे मानले जात आहे.
New cancer cure found
New cancer cure foundsaam tv
Published On
Summary
  • जपानी शास्त्रज्ञांनी कॅन्सरवर नवीन उपचार शोधला आहे.

  • AUN थेरपी इम्यून सिस्टिमवर अवलंबून नाही.

  • दोन बॅक्टेरियांच्या मिश्रणाने ट्यूमर नष्ट होतो.

कॅन्सर उपचाराच्या जगात जपानी शास्त्रज्ञांनी अशी मोठा शोध लावला आहे. हा शोध पुढील काही वर्षांत वैद्यकीय शास्त्राची दिशा बदलू शकणार आहे. जपान अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (JAIST) मधील संशोधकांनी एक बॅक्टेरिया-आधारित थेरपी विकसित केली आहे. जी शरीराच्या इम्यून सिस्टिमची मदत न घेता थेट कॅन्सर ट्यूमरवर हल्ला करून त्याला नष्ट करू शकते. या उपचाराला AUN बॅक्टेरिया कॅन्सर ट्रीटमेंट असं नाव दिलं गेलं आहे.

१५० वर्ष जुन्या प्रयोगातून नवी क्रांती

कॅन्सरवर संशोधन करताना शास्त्रज्ञांनी नेहमी शरीरातील इम्यून सिस्टिमला मजबूत करून कॅन्सरशी लढण्याचा प्रयत्न केला. १९व्या शतकाच्या शेवटी डॉ. विल्यम कोली यांनी यावर सर्वात पहिला प्रयोग केला. तोच पुढे जाऊन आधुनिक इम्यूनोथेरपीचा पाया ठरल्याची नोंद आहे.

यामधील सगळ्यात मोठी अडचण ही होती की, ज्यांचं इम्यून सिस्टिम कमकुवत होतं अशा रुग्णांना या उपचाराचा फारसा फायदा होत नव्हता. हीच उणीव भरून काढण्यासाठी JAIST च्या शास्त्रज्ञांनी अशी पद्धत तयार केली आहे जी इम्यून सिस्टिमवर अवलंबून नसून थेट कॅन्सर पेशींवर हल्ला करते.

एयूएन थेरपी कशी काम करते?

ही थेरपी दोन वेगवेगळ्या बॅक्टेरियांच्या मिश्रणातून बनवली आहे.

  • A-gyo – हा बॅक्टेरिया थेट ट्यूमरपर्यंत पोहोचतो आणि कॅन्सर पेशी व त्यांना पोसणाऱ्या रक्तवाहिन्यांवर हल्ला करतो.

  • UN-gyo – हा बॅक्टेरिया A-gyo च्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो जेणेकरून संसर्ग शरीरात पसरू नये आणि तो फक्त ट्यूमरपुरताच मर्यादित राहावा.

New cancer cure found
Monsoon sports injuries: पावसाळ्यात मुलांमध्ये वाढतोय ऑर्थोपेडिक दुखापतींचा धोका; काळजी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन

महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी इंजेक्शनद्वारे ही थेरपी देतात तेव्हा मिश्रणात साधारण ३% A-gyo आणि ९७% UN-gyo असतो. पण ट्युमरच्या आत पोहोचल्यावर हा अनुपात बदलतो आणि जवळपास ९९% A-gyo एक्टिव्ह होतो. या बदलामुळे ट्यूमर पटकन नष्ट होतो आणि त्याचवेळी साइड इफेक्ट्सवरही नियंत्रण राहते.

इम्यूनो थेरेपीपेक्षा मोठा फरक

सध्या उपलब्ध असलेली इम्यूनोथेरपी CAR-T किंवा Checkpoint inhibitors फक्त तेव्हाच काम करतात जेव्हा शरीराचा इम्यून सिस्टिम मजबूत असते. पण एयूएन थेरपी पूर्णपणे इम्यून-इंडिपेंडंट आहे. म्हणजेच इम्यून सिस्टिम कमकुवत असतानाही ही थेरपी ट्यूमर नष्ट करू शकते.

New cancer cure found
Health Tips: बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा; 'हे' आजार होण्याचा असतो धोका

यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की, ज्या मॉडेलमध्ये इम्यून सिस्टिम कमजोर होती त्यातसुद्धा ट्यूमर पूर्णपणे नष्ट झाला. त्याशिवाय गंभीर दुष्परिणाम जसं की, सायटोकिन रिलीज सिंड्रोम आढळले नाहीत.

New cancer cure found
Health tests before joining gym: तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; जीममध्ये व्यायाम करण्यापूर्वी आरोग्याच्या 'या' टेस्ट करून घ्याच

रुग्णांसाठी नवी आशा

आत्तापर्यंतच्या उपचारांमधून आराम न मिळालेल्या रुग्णांसाठी ही थेरपी नवा आशेचा किरण ठरू शकते. या संशोधनाचं नेतृत्व करणारे प्राध्यापक एजिरो मियाको यांनी सांगितलं की, पुढील काही वर्षांत याचं क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची तयारी आहे. शास्त्रज्ञांचा उद्देश आहे की, पुढील ६ वर्षांत ही नवी तंत्रज्ञान प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचवावी.

New cancer cure found
Obesity prevention: भारतीयांमध्ये वाढतेय लठ्ठपणाची समस्या; आरोग्य मंत्रालयाने दिल्या धोका कमी करण्याच्या सोप्या टीप्स
Q

AUN बॅक्टेरिया थेरपी कोणत्या संस्थेने विकसित केली?

A

जपान अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (JAIST) ने.

Q

AUN थेरपीमध्ये कोणते दोन बॅक्टेरिया वापरले जातात?

A

A-gyo आणि UN-gyo हे दोन बॅक्टेरिया वापरले जातात.

Q

AUN थेरपी इम्यूनोथेरपीपेक्षा कशी वेगळी आहे?

A

ही थेरपी इम्यून सिस्टिमवर अवलंबून नसून थेट ट्यूमरवर हल्ला करते.

Q

ट्यूमरमध्ये A-gyo बॅक्टेरियाचे प्रमाण किती वाढते?

A

ट्यूमरमध्ये A-gyo चे प्रमाण जवळपास ९९% पर्यंत वाढते.

Q

या थेरपीचे क्लिनिकल ट्रायल केव्हा सुरू होण्याची शक्यता आहे?

A

पुढील काही वर्षांत क्लिनिकल ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com