Breast cancer recurrence: 20% महिलांना ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याची असते शक्यता; 'या' उपायांनी धोका कमी करता येणं शक्य

Preventing breast cancer recurrence: आधुनिक जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे (स्तन कर्करोग) प्रमाण वाढत आहे. उपचारांनंतरही सुमारे २० टक्के महिलांना या कर्करोगाची पुन्हा होण्याची (पुनरावृत्ती) शक्यता असते.
Breast Cancer
Breast Cancersaam tv
Published On
Summary
  • ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमधील सर्वात सामान्य कॅन्सर आहे.

  • सुरुवातीच्या टप्प्यात ७६% रुग्णांमध्ये कॅन्सर ओळखला जातो.

  • २०% रुग्णांमध्ये १० वर्षांत पुनरावृत्ती होते.

ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आणि जीवघेणा कॅन्सर मानला जातो. भारतात जागरूकता आणि वैद्यकीय प्रगतीमुळे आता जवळपास ७६ टक्के रुग्णांमध्ये हा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कॅन्सर म्हणजे गाठ फक्त स्तनामध्ये किंवा जवळच्या लिम्फ नोड्समध्ये असते पण शरीराच्या इतर भागात पसरलेली नसते. हा कॅन्सर ०, १, २ किंवा ३ या टप्प्यांपैकी कुठल्याही टप्प्यात असू शकतो.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, अर्ली ब्रेस्ट कॅन्सर (EBC) असलेल्या जवळपास २० टक्के महिलांना १० वर्षांच्या आत पुन्हा स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. वय, ट्यूमरचा आकार, प्रभावित लिम्फ नोड्सची संख्या, जनुकांतील बदल किंवा असामान्य जनुकीय क्रिया यांसारखे अनेक घटक प्रत्येक रुग्णामध्ये धोका वेगळा करतात. म्हणून, हा धोका समजून घेणं आणि योग्य उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे.

Breast Cancer
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

उपचारातील नवी दृष्टी

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे स्तनाच्या कॅन्सरमधून वाचलेल्या महिलांसाठी आशा वाढली आहे. हार्मोनवर आधारित औषधं आणि शरीरातील आरोग्यदायी टिश्यूंना न दुखवता फक्त कॅन्सर पेशींना लक्ष्य करणारे उपचार उपलब्ध झाले आहेत. आता फक्त अल्पकाळासाठी कॅन्सर नियंत्रित करण्याऐवजी, दीर्घकाळ पुनरावृत्ती होऊ नये आणि जीवनाचा दर्जा चांगला राहावा यावर अधिक भर दिला जातो.

सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालिका आणि ऑन्कोलॉजी रिसर्चच्या संचालिका डॉ. सेवंती लिमये म्हणाल्या, सुरुवातीच्या टप्प्यावरील ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा होतो, अशी सर्वसाधारण समजूत आहे. पण प्रत्यक्षात, लवकर निदान झाले तरीही कॅन्सर परत येण्याची भीती कायम असते. कधी कधी ती ५० टक्क्यांपर्यंतही असू शकते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाने प्रगत उपचारांच्या पर्यायांबद्दल सतत जागरूक राहणं आणि डॉक्टरांशी चर्चा करणं आवश्यक आहे. तुमचा वैयक्तिक धोका समजून घेऊन आणि तुमच्या आरोग्य तज्ज्ञांच्या टीमसोबत मिळून काम केल्यास तुम्ही पुनरावृत्तीचा धोका कमी करू शकता.

Breast Cancer
Gallbladder Cancer: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा पित्ताशयाचा कॅन्सर झालाय; 'या' कारणाने ५ पट धोका वाढतो

अर्ली ब्रेस्ट कॅन्सरची पुनरावृत्ती कमी करण्यासाठी ५ महत्त्वाचे उपाय

वजन व एक्टिव्ह जीवनशैली राखा

जास्त वजन आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार, फळं-भाज्या, पूर्ण धान्यं आणि हलका प्रोटीन यांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. हे सर्व घटक पुन्हा कर्करोग होण्याची शक्यता कमी करतात.

Breast Cancer
Heart Attack Signs: चेहऱ्यावर 'ही' लक्षणं दिसली तर समजा की हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

नियमित तपासणी आणि फॉलो-अप करा

पुनरावृत्ती लवकर ओळखली गेल्यास उपचार अधिक प्रभावी होतात. डॉक्टरांनी दिलेल्या फॉलो-अप वेळापत्रकाचे पालन करणं गरजेचं आहे. गाठी, वेदना, थकवा किंवा कोणतीही नवीन लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

Breast Cancer
High blood pressure: ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय; हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी लक्षणं ओळखा

प्रगत उपचारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या

हार्मोन-आधारित औषधं आणि थेरपी यामुळे जीवनाचा दर्जा चांगला ठेवत पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता कमी करता येते. भारतात अशा उपचारांविषयी जागरूकता वाढत आहे. त्यामुळे रुग्णांनी “माझ्यासाठी कोणते प्रगत उपचार उपलब्ध आहेत?” हा प्रश्न नक्की विचारावा. यशस्वी उपचाराबरोबरच दीर्घकाळाची काळजी, मानसिक आरोग्य आणि जीवनाचा दर्जा यांनाही तेवढेच महत्त्व द्यायला हवे.

Breast Cancer
Healthy Breakfast: दिवसाची सुरुवात हेल्दी अन् टेस्टी! झटपट तयार होणारे हे ५ पदार्थ नक्की ट्राय करा

मानसिक आणि भावनिक आरोग्य सांभाळा

भावनिक आरोग्य उत्तम असेल तर शरीर लवकर सावरते आणि दीर्घकाळ निरोगी राहता येते. समुपदेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे चिंता कमी होते. नैराश्य, भीती किंवा पुनरावृत्तीची काळजी वाटत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Breast Cancer
Healthy Breakfast: दिवसाची सुरुवात हेल्दी अन् टेस्टी! झटपट तयार होणारे हे ५ पदार्थ नक्की ट्राय करा

तंबाखू टाळा आणि मद्यपान मर्यादित ठेवा

धूम्रपान आणि जास्त मद्यपानामुळे पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. धूम्रपान सोडण्यासाठी समुपदेशन किंवा इतर मदत घ्यावी. शक्य असल्यास मद्यपान पूर्णपणे टाळावं. या सवयींबाबत डॉक्टरांशी बोलून वैयक्तिक मार्गदर्शन घ्यावं.

Breast Cancer
Healthy breakfast ideas: तुमचा नाश्ता नक्की हेल्दी आहे? आरोग्यासाठी योग्य वाटणारे 'हे' पदार्थ ठरतायत धोकादायक
Q

भारतात ब्रेस्ट कॅन्सरचे किती टक्के रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले जातात?

A

जवळपास ७६ टक्के रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले जातात.

Q

अर्ली ब्रेस्ट कॅन्सरनंतर पुनरावृत्तीचा धोका किती टक्के आहे?

A

जवळपास २० टक्के महिलांना १० वर्षांत पुनरावृत्ती होऊ शकते.

Q

पुनरावृत्तीचा धोका कमी करण्यासाठी कोणती जीवनशैली फायदेशीर आहे?

A

वजन नियंत्रण, व्यायाम आणि संतुलित आहार फायदेशीर आहे.

Q

ब्रेस्ट कॅन्सरनंतर मानसिक आरोग्य का महत्त्वाचे आहे?

A

मानसिक आरोग्य चांगले असल्यास शरीर लवकर सावरते.

Q

पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका वाढवणारे घटक कोणते?

A

धूम्रपान, जास्त मद्यपान आणि निष्क्रिय जीवनशैली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com