Gallbladder Cancer: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा पित्ताशयाचा कॅन्सर झालाय; 'या' कारणाने ५ पट धोका वाढतो

Gallbladder Cancer In India: त्ताशयाचा कर्करोग हा एक दुर्मिळ प्रकार आहे. त्याचे सुरुवातीचे निदान करणे कठीण असते, कारण त्याची लक्षणे सामान्य पोटाच्या समस्यांसारखी असतात.
Gallbladder Cancer
Gallbladder Cancersaam tv
Published On
Summary
  • पित्ताशयाचा कॅन्सर सुरुवातीला लक्षणं दाखवत नाही.

  • भारतात गॉलब्लॅडर कॅन्सरची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत.

  • पित्ताशयात स्टोन असल्यास कॅन्सरचा धोका ५ पट वाढतो.

पित्ताशयाचा म्हणजेच गॉलब्लॅडरचा कॅन्सर दुर्मिळ मानला जातो. पण अलीकडच्या काही वर्षांत हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो आहे. या कॅन्सरला अनेकदा सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची ठळक लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे जेव्हा रुग्णांमध्ये कॅन्सरचं निदान होतं तेव्हा तो बराच पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. मात्र वेळेत निदान झाल्यास यावर नियंत्रण ठेवणं सोपं ठरू शकतं.

भारतात पित्ताशयाच्या कॅन्सरचा कर्करोग का वाढतोय?

अहवाल आणि आकडेवारीनुसार, भारतात गॉलब्लॅडर कॅन्सरची प्रकरणं मोठ्या प्रमाणात आढळतायत. जगभरातील गॉलब्लॅडर कॅन्सरच्या सुमारे १० टक्के प्रकरणं भारतात नोंदवली जातात. विशेषत: उत्तर भारत, ईशान्य भारत, मध्य आणि पूर्व भारत या भागांत हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. पश्चिमी देशांच्या तुलनेत भारतात कमी वयात हा आजार होतो. साधारणपणे ५० ते ६० वर्षांच्या वयात किंवा त्याहूनही कमी वयात रुग्णांमध्ये हा कॅन्सर आढळतो.

पित्ताशयाचा कॅन्सर होण्याची कारणं

  • पित्ताशयात स्टोन असणं

  • पित्ताशयात सतत सूज येणं

  • पित्ताशयात गाठ किंवा सिस्ट असणं

  • लठ्ठपणा किंवा शरीराचं जास्त वजन

  • वय वाढणं

  • अनुवंशिक कारणं

  • संसर्ग

Gallbladder Cancer
Heart attack warning signs: महिलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही 6 महत्त्वाची लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

विशेष म्हणजे पित्ताशयात स्टोन असल्यास कॅन्सरचा धोका ५ पट वाढतो. स्टोन ही सामान्य समस्या असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. मात्र प्रत्येकाला पथरीमुळे कर्करोग होतो असं नाही, पण ज्यांना पथरी आहे त्यांनी नियमित तपासण्या करून घ्यायला हव्यात.

पित्ताशयाच्या कॅन्सरची लक्षणं

  • पोटाच्या उजव्या बाजूला सतत होणारा त्रास किंवा वेदना

  • वारंवार मळमळ होणं किंवा उलटी होणं

  • पिवळसरपणा

  • वेगाने वजन कमी होणं

  • वारंवार ताप येणं

  • पोट फुगल्यासारखं वाटणं

  • जेवल्यानंतर पोटात जडपणा जाणवणं

  • पोटात गाठी तयार होणं

या लक्षणांचा बराचसा संबंध सामान्य पचनाच्या समस्यांसोबत दिसतो. त्यामुळे अनेकदा लोक हे लक्षणं गांभीर्याने लक्ष देत नाहीत. पण जर ही समस्या वारंवार जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Gallbladder Cancer
Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

पित्ताशयाच्या कॅन्सरवर उपचार

जर सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर आढळला तर शस्त्रक्रियेद्वारे पित्ताशय काढून टाकलं जातं. पण जर कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरला असेल किंवा गंभीर स्वरूपाचा असेल तर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड औषधं आणि पॅलिएटिव्ह केअरच्या मदतीने उपचार केले जातात.

Gallbladder Cancer
Acidity in women: ॲसिडीटी, अपचन समजून ५०% लोकं करतायत 'या' गंभीर समस्येकडे दुर्लक्ष; सर्वाधिक महिला आणि मधुमेहींचा समावेश
Q

पित्ताशयाच्या कॅन्सरला 'सायलेंट किलर' का म्हटले जाते?

A

सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे न दिसल्यामुळे त्याला सायलेंट किलर म्हणतात.

Q

भारतात गॉलब्लॅडर कॅन्सरची किती टक्के प्रकरणे आढळतात?

A

जगातील १० टक्के गॉलब्लॅडर कॅन्सरची प्रकरणे भारतात आहेत.

Q

पित्ताशयात पथरी असण्याचा कॅन्सरवर काय परिणाम होतो?

A

पित्ताशयात पथरी असल्यास कॅन्सरचा धोका ५ पट वाढतो.

Q

पित्ताशयाच्या कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

A

पोटाच्या उजव्या बाजूला सतत वेदना हे सर्वात सामान्य लक्षण आहे.

Q

सुरुवातीच्या टप्प्यात पित्ताशयाच्या कॅन्सरचा उपचार कोणता?

A

सुरुवातीच्या टप्प्यात पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com