Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

Head and neck cancer symptoms: डोके आणि मानेचा कॅन्सर हा जगातील सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. यात तोंड, घसा, स्वरयंत्र , नाक, सायनस आणि लाळ ग्रंथींच्या कर्करोगांचा समावेश होतो.
Head neck cancer signs
Head neck cancer signssaam tv
Published On

तोंड, नाकपुड्या, सायनस, ओठ, लाळग्रंथी, घसा, आणि स्वरयंत्र या भागांमध्ये होणाऱ्या कॅन्सरला हेड अँड नेक कॅन्सर (Head & Neck Cancer) असं म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर येतो. हा शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या भागांवर परिणाम करतो.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार, 2025 मध्ये अमेरिकेत सुमारे 72,680 लोकांना हेड अँड नेक कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. याशिवाय सुमारे 16,680 रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. नुकतंच प्रसिद्ध ब्रिटिश रॉकस्टार डेव्हिड रोच यांना हेड अँड नेक कॅन्सर झाल्याचं उघड झालं. सुरुवातीला त्यांना फक्त सर्दी, खोकला आणि थकवा वाटत होता.

‘मॅकमिलन कॅन्सर सपोर्ट’ संस्थेच्या मते, हेड आणि नेक कॅन्सरची सुरुवातीच्या काळात काही लक्षणं दिसून येतात. पण ती हेड अँड नेक कॅन्सरची सुरुवात असू शकतात. त्यामुळे ही लक्षणं वेळेत ओळखणं गरजेचं आहे.

Head neck cancer signs
Cerebral veins: मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसून येतात 'हे' बदल; सामान्य समजून इग्नोर करू नका

तोंडात न बऱ्या होणाऱ्या जखमा

जर तुमच्या तोंडात, विशेषतः जीभेवर किंवा ओठाजवळ तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जखम असेल, तर ती केवळ सामान्य जखम नाहीये. NHS लंडनच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. जोनाथन केंटली यांच्यानुसार, तोंड आणि घशात “स्क्वॅमस सेल कार्सिनोमा” नावाचा कॅन्सर धूम्रपान किंवा HPV व्हायरसमुळे होतो.

मानेवर गाठ येणं

मानेवर गाठ येणं अनेक वेळा सामान्य कारणांमुळेही होऊ शकते, पण जर ती गाठ 2-3 आठवड्यांनंतरही कमी होत नसेल, तर ती दुर्लक्षित करू नका. अशा गाठी सामान्यतः वेदनारहित असतात. हेड अँड नेक कॅन्सर लसिका ग्रंथींमध्ये (lymph nodes) पसरतो आणि त्यांचं सुजणं हे याचं लक्षण असू शकतं.

ओठावर गाठ येणं

हेड अँड नेक कॅन्सर 30 पेक्षा जास्त भागांमध्ये होऊ शकतो. यातील ९०% कॅन्सर स्क्वॅमस सेल्समधून सुरू होतो. हा कॅन्सर ओठ, तोंड, घसा आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. ओठावर अचानक गाठ येणं, किंवा सतत घट्ट वाटणं हे लिप कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे येणं

तोंडात फक्त लाल रंगाचे डाग किंवा लाल आणि पांढरे मिसळलेले डाग दिसत असल्यास, हे कॅन्सरच्या पहिल्यांदा दिसणाऱ्या टप्प्याचे चिन्ह मानलं जातं. हे चट्टे ओरल कॅन्सरमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Head neck cancer signs
Brain Tumor Early Symptoms : ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये शरीरात दिसतात हे 6 मोठे बदल; लक्षण ओखळून लगेच डॉक्टरकडे जा

काहीही लक्षण नसूनही अचानक वजन घटणं

काही रुग्णांना सतत थकवा, जेवण्याची इच्छा कमी होणं, वजन कमी होणं अशी लक्षणं जाणवतात. अशावेळी ही लक्षणं शरीरातील गंभीर आजाराची विशेषतः कॅन्सरची सुरुवात असू शकतात.

Head neck cancer signs
Signs of brain tumor: मेंदूमध्ये तयार होत असलेल्या गाठीला कसं ओळखाल? शरीरात दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नका

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com