Brain Tumor Early Symptoms : ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये शरीरात दिसतात हे 6 मोठे बदल; लक्षण ओखळून लगेच डॉक्टरकडे जा

Six Early Signs Brain Tumor: ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणं सामान्य वाटू शकतात. त्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्रास होऊ शकतो.
Brain Tumor Early Symptoms
Brain Tumor Early Symptomssaam tv
Published On

कोणतीही समस्या असेल तरी शरीर आपल्याला त्याचे संकेत देत असतं. हे संकेत आपल्याला ओळखून त्यावर उपचार घेणं गरजेचं आहे. असंच जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल शिवाय कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होत असतील याशिवाय तुमची स्मरणशक्ती कमी होत असेल किंवा तुम्हाला चालण्यास त्रास होतोय का? तर सावधान व्हा.

जर तुम्हाला हे सर्व त्रास होत असतील तर हे फक्त थकवा नसून एखाद्या गंभीर गोष्टीचं लक्षण असू शकतं. ब्रेन ट्यूमर हा एक आजार आहे जो लोकांना सहसा उशिरा लक्षा येतो. याचं कारण म्हणजे या समस्येची लक्षणं अगदी सामान्य वाटू लागतात. ही लक्षणं कोणती आहेत ती जाणून घेऊया.

सतत डोकेदुखी

ब्रेन ट्यूमरचं सर्वात सामान्य आणि सुरुवातीचं लक्षण असतं ते म्हणजे सततची डोकेदुखी. विशेषतः जर सकाळी उठल्यावर तीव्र प्रमाणात डोकेदुखी होत असेल आणि औषधांनी आराम मिळत नसेल तर ही चिंतेची बाब असू शकते.

विनाकारण उल्टी होणं

जर तुम्हाला उल्टीचा त्रास आणि जीव घाबरा होत असेल तर हे लक्षण चांगलं नाही. यामध्ये खासकरून जर तुम्हाला सकाळच्या वेळेस हा त्रास होत असेल तर हे तुमच्या मेंदूवर ताण पडत असल्याचं लक्षण आहे.

चालण्यात असमतोल

ब्रेन ट्यूमर शरीराचं संतुलन नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागावर परिणाम करू शकतात. यामुळे अचानक चालण्यात अडथळा येणं, तोल जाणं ही लक्षणं असू शकतात.

Brain Tumor Early Symptoms
Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

बोलण्यामध्ये समस्या

जर तुमची श्रवणशक्ती अचानक कमी झाली किंवा तुम्हाला बोलण्यात अडचण येत असेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे संवादाशी संबंधित मेंदूच्या भागावर परिणाम झाल्याचं लक्षण असतं.

अंधुक दृष्टी

ब्रेन ट्यूमरचा तुमच्या डोळ्यांवरही परिणाम होताना दिसतो. यामध्ये अंधुक दृष्टी, डबल विजन किंवा एका डोळ्यात दिसण्यात अडचण ही सर्व ब्रेन ट्यूमरची लक्षणं असू शकतात.

Brain Tumor Early Symptoms
Thyroid Symptoms Morning : सकाळी उठताच दिसून येतात थायरॉईडची ५ लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

स्मरणशक्ती

जर तुम्ही काही गोष्टी विसरू शकत असाल किंवा विचार करण्यासाठी वेळ लागत असेल तर सावध व्हा. कारण हे देखील ब्रेन ट्यूमरतं लक्षण असू शकतं.

Brain Tumor Early Symptoms
Period Pain : पीरियड्समध्ये पेनकिलर्स घेणं किती धोकादायक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com