Period Pain : पीरियड्समध्ये पेनकिलर्स घेणं किती धोकादायक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

Painkillers during Periods Dangers: मासिक पाळीमध्ये जवळपास ९९ टक्के महिलांना वेदनांचा त्रास सहन करावा लागतो. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून या काळात महिलांना कधीकधी असह्य वेदनांचा सामना करावा लागतो.
Painkillers during Periods Dangers
Painkillers during Periods Dangerssaam tv
Published On

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामध्ये महिलेला वेदनांचा सामना करावा लागू शकतो. पोटात वेदना, पाठीत वेदना तसंच क्रॅम्प्स येणं या समस्या महिलांना जाणवतात. यावेळी वेदना होऊ नये म्हणून महिला पेनकिलर घेतात. मात्र तुम्हाला माहितीये का असं किती सुरक्षित आहे?

मासिक पाळीमध्ये पेन किलर्सचा वापर

मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी महिला पेनकिलर्सचा वापर करतात. आरोग्य तज्ञांच्या मते, मासिक पाळी दरम्यान या औषधांच्या वापरामुळे कोणतेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. तसंच, त्याचा गर्भधारणेवर कोणताही परिणाम होत नाही.

Painkillers during Periods Dangers
Fruit Salt in Food: इडली बॅटरसाठी एसिडीटी पळवण्याच्या Fruit salt चा वापर करताय? आजारी पडण्यापूर्वी धोके जाणून घ्याच

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

आरोग्य तज्ञांच्या मतानुसार, मासिक पाळीच्या काळात महिलांमध्ये प्रोस्टॅग्लॅंडिन वाढतात. यामुळे गर्भाशयाचं अस्तर गळू लागतं. यावेळी गर्भाशय आकुंचन पावतं आणि हा थर आणि रक्त बाहेर निघतं. या प्रक्रियेमध्ये महिलांना मासिक पाळीच्या वेळी तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. पेनकिलर्स गर्भाशयाचं आकुंचन काही प्रमाणात कमी होण्यास मदत करू शकतात. ज्यामुळे वेदना कमी होऊ शकतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेदनाशामक औषधांचा जास्त वापर शरीराला हानी पोहोचवण्याचा धोका असतो. मासिक पाळीच्या वेळी वारंवार वेदनाशामक औषध घेतल्यास शरीरात आढळणारे फायदेशीर बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. यामुळे हृदय, यकृत, आतडे आणि किडनीचे आजार होण्याचा धोका असतो.

Painkillers during Periods Dangers
Diabetes Control: सकाळी रिकाम्या पोटी खा हे पदार्थ; औषधांशिवाय कंट्रोलमध्ये राहील डायबेटीस

घरगुती उपाय करा

औषधांव्यतिरिक्त, मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांसाठी महिला काही घरगुती उपाय देखील करू शकतात. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या घरगुती उपायांचा शरीरावर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही. यामध्ये ओटीपोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवल्यास आराम मिळतो आणि वेदनाही कमी होता.

Painkillers during Periods Dangers
Heart Pacemaker: तांदळाच्या आकाराचा पेसमेकर; हृदयात कसं बसवणार, काम कसं करणार जाणून घ्या संपूर्ण माहिती

हॉट वॉटर बॅगशिवाय योगा, चालणं किंवा हलका व्यायाम यासारखे व्यायाम शरीरात रक्ताभिसरण वाढवतात. ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com