Fruit Salt in Food: इडली बॅटरसाठी एसिडीटी पळवण्याच्या Fruit salt चा वापर करताय? आजारी पडण्यापूर्वी धोके जाणून घ्याच

Fruit Salt Idli Batter Dangers : सकाळी नाश्त्याला इडली बनवायची म्हटलं की, अनेकदा पीठ आंबवणं विसरून जातो. यासाठी आपण एसिडीटीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या Fruit salt चा वापर करतो. मात्र असं करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Side Effects of Fruit Salt in Food
Side Effects of Fruit Salt in Foodsaam tv
Published On

आपल्याकडे अनेकदा नाश्त्याला इडली सांबार बनवलं जातं. अनेकजण इडली बनवण्यासाठी Fruit salt चा वापर करतात. आजकाल बाजारात अनेक Fruit salt मिळतात. हे पाण्यात मिसळून याचं सेवन केल्यास त्वरित यापासून आराम मिळू शकतो.

Fruit salt घालून पीठ आंबवलं जातं. यामुळे पीठ लवकर फर्मेंट होतं. त्यामुळे बहुतेक लोक इडली बनवण्यासाठी त्याचा वापर करतात. Fruit salt चा वापर आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जेवणात Fruit salt चा वापर किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

किती प्रमाणात हानिकारक?

अन्नपदार्थांमध्ये Fruit salt घालून आंबवणं हे आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. Fruit salt घातल्याने इडली, डोसे इत्यादी मऊ आणि चविष्ट बनतात. परंतु ते जास्त काळ आणि जास्त प्रमाणात याचं वापर करणं तुमच्या आरोग्या वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Fruit salt मध्ये असतं हे केमिकल

गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी Fruit salt उपयुक्त आहे. Fruit salt मध्ये सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट आणि सायट्रिक आम्ल यांचे मिश्रण असतं, जे पाण्यात विरघळल्यावर कार्बन डायऑक्साइड तयार करतं. हा घटक जे पोटातील वायू म्हणजेच गॅस निष्क्रिय करतं. यामुळे अपचन आणि गॅसपासून त्वरित आराम मिळतो.

Side Effects of Fruit Salt in Food
Brain tumor: निरोगी व्यक्तींमध्येही दिसतात ब्रेन ट्यूमरची ४ लक्षणं; दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

Fruit salt चे हानिकारक परिणाम

रक्तदाबाचा धोका

Fruit salt मध्ये सोडियम बायकार्बोनेट असतं. ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सोडियम आणि सोडियम बायकार्बोनेटचे सेवन कमीत कमी केलं पाहिजे.

किडनीवर परिणाम

Fruit salt मध्ये असलेलं अँटासिड तुमच्या किडनीवर वाईट परिणाम करू शकतं. मर्यादित प्रमाणात अँटासिड्स घेतल्याने आरोग्यावर कोणताही विशेष परिणाम होत नाही. मात्र दीर्घकाळ याचं सेवन केल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो.

Side Effects of Fruit Salt in Food
Leg Vein Blockage: पायाच्या ब्लॉक नसा उघडण्यासाठी सोपे ४ उपाय; वेदनेपासूनही मिळेल त्वरित आराम

हृदय

फळांच्या मीठात सोडियम कार्बोनेट आढळतं. ज्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या हृदयरोगांचा धोका वाढू शकतो.

Side Effects of Fruit Salt in Food
Early Puberty: 9 ते 10 वर्षांच्या मुलींना का येतेय मासिक पाळी? जाणून घ्या यामागील मुख्य कारणं

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com