Leg Vein Blockage: पायाच्या ब्लॉक नसा उघडण्यासाठी सोपे ४ उपाय; वेदनेपासूनही मिळेल त्वरित आराम

Blocked Leg Veins Home Remedies : पायांमध्ये नसा ब्लॉक होणं ही समस्या आता सामान्यपणे दिसून येते. कधीकधी पायांच्या ब्लॉक झालेल्या नसांमध्ये वेदना झाल्यामुळे चालण्यासही त्रास होतो. या ४ उपायांच्या मदतीने तुम्ही ब्लॉक झालेल्या नसांच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.
Leg Vein Blockage
Leg Vein Blockagesaam tv
Published On

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरूण व्यक्तींमध्येही अनेक समस्या दिसून येतात. यामध्ये खासकरून रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची समस्याही दिसून येते. तरूणांमध्ये अधिकतर पायाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागतात. यामुळे पायांमध्ये तीव्र वेदना होण्याची समस्याही जाणवते.

बंद नसांमुळे तरूणांच्या पायांमध्ये नसा स्पष्टपणे दिसून येतात. पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर त्या सुरळीत करण्यासाठी औषधांसोबत तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. हे उपाय काय आहेत ते पाहूयात.

गरम पाण्याने शेक द्या

ब्लॉक झालेल्या पायांच्या नसा उघडण्यासाठी त्याला गरम पाण्याने शेक द्या. यावेळी गरम पाण्यात काही वेळ पाय तसेच ठेऊन द्या. गरम पाण्यामध्ये काही वेळ पाय ठेवल्यानंतर सूज येत नाही आणि पायालाही आराम मिळतो. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन पायाच्या वेदनाही कमी होतात.

मालिश

बंद नसांमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मालिश करू शकता. यावेळी तुम्ही कोमट तेल घेऊन हलक्या हाताने मालिश करा. मालिश केल्याने वेदना कमी होऊ लागतात. मात्र हे करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

Leg Vein Blockage
Earwax accumulation : कानात सतत घाण का जमा होते? कान साफ करण्याची घरगुती आणि सोप्या पद्धती

व्यायाम

ब्लॉक नसा उघडण्यासाठी दररोज एक्सरसाइज करा. ज्यामध्ये पायी चालणं, स्विमिंग तसंच सायकलिंग याचा समावेश आहे. या एक्सरसाईज केल्याने नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो. शिवाय ब्लॉक झालेल्या नसा उघडण्यास मदत होते.

Leg Vein Blockage
Cerebral edema: मेंदूच्या नसा फुगल्यावर शरीर देतं खास संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा जीव गमवाल

योगा

बंद नसा उघडण्यासाठी तुम्ही दररोज योग करू शकता. योगासन केल्यामुळे ब्लॉक झालेल्या नसा उघडण्यास मदत होते. मात्र योग करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. पायामध्ये ब्लॉक झालेल्या नसा उघडण्यासाठी वृक्षासन, भुजंगासन, उत्तानपादासन, प्राणायाम, पवनमुक्तासन या गोष्टी करू शकता.

Leg Vein Blockage
Spices Reduce Cholesterol : नसांना चिकटलेलं फॅट खेचून बाहेर काढतील हे मसाले; कोलेस्ट्रॉलवरचा उपाय तुमच्या किचनमध्येच लपलाय

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com