Spices Reduce Cholesterol : नसांना चिकटलेलं फॅट खेचून बाहेर काढतील हे मसाले; कोलेस्ट्रॉलवरचा उपाय तुमच्या किचनमध्येच लपलाय

Natural Way To Control Cholesterol: उच्च कोलेस्ट्रॉलचा थेट जीवाला धोका नाही मात्र तुम्ही दीर्घकाळ दुर्लक्ष केले तर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक सारख्या घातक आजारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
Natural Way To Control Cholesterol
Natural Way To Control Cholesterolsaam tv
Published On

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यातीलच एक समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल हे रक्तात असलेलं एक फॅट मानलं जातं. कोलेस्ट्रॉल हे दोन प्रकारचे असतात. यामध्ये एचडील कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल यांचा समावेश आहे. शरीराचे कार्य नीट राहण्यासाठी या दोघांचा समतोल आवश्यक आहे.

मात्र सध्या चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे उद्भवते. त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल वाढलं की, हृदयरोगाचा धोका वेगाने वाढतो.

परंतु तुम्हाला माहितीये का की, या कोलेस्ट्रॉलचा उपाय तुमच्या किचनमध्येच लपला आहे. स्वयंपाकघरात असलेल्या काही मसाल्यांच्या मदतीने आपण नैसर्गिकरित्या एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता. कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणं सहसा दिसून येत नाहीत. पण कोलेस्ट्रॉल सतत जास्त असेल तर हात-पायात मुंग्या येणे, थकवा, दम लागणं अशी लक्षणं जाणवू लागतात.

Natural Way To Control Cholesterol
Heavy periods and cancer: पिरीयड्सचा Blood Flow ठरतो कॅन्सरचं कारण; किती प्रमाणात रक्तस्राव असतो नॉर्मल?

हळद

हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्ही रात्री दुधासह हळदीचं सेवन करत असाल तर हे तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. सकाळी स्मूदीमध्ये घालू शकता आणि आपल्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी मसाले म्हणून देखील वापरू शकता.

दालचीनी

आयुर्वेदानुसार, दालचिनीमध्ये शक्तिशाली गुणधर्म असतात. हे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतात आणि एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात. याचं नियमित सेवन हृदयाचे आजारांपासून रक्षण करण्याचं काम करतात.

Natural Way To Control Cholesterol
Earwax accumulation : कानात सतत घाण का जमा होते? कान साफ करण्याची घरगुती आणि सोप्या पद्धती

लसूण

लसूण त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो, ज्यामध्ये हृदय निरोगी ठेवण्याच्या क्षमतेचा समावेश आहे. लसूणमध्ये आढळणारे अॅलिसिन हे कंपाऊंड एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्याशी जोडलं गेलंय. आपल्या शरीरातून नैसर्गिकरित्या खराब एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी लसूण तुम्हाला मदत करतं.

Natural Way To Control Cholesterol
Cerebral edema: मेंदूच्या नसा फुगल्यावर शरीर देतं खास संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा जीव गमवाल

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com