Heavy periods and cancer: पिरीयड्सचा Blood Flow ठरतो कॅन्सरचं कारण; किती प्रमाणात रक्तस्राव असतो नॉर्मल?

Period blood flow and cancer: अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्रावाचा त्रास होतो. मात्र तुम्हाला माहितीये का हा त्रास कॅन्सरशी संबंधित असू शकतो.
Heavy periods and cancer
Heavy periods and cancersaam tv
Published On

महिलांसाठी मासिक पाळी ही एक नॅचरल प्रोसेस मानली जाते. प्रत्येक महिलेला याचा सामना करावा लागतो. मासिक पाळी येण्यापूर्वी आणि आल्यावर महिलांना अनेक तक्रारी उद्भवतात. यामध्ये पोटदुखी, पाठदुखी तसंच क्रॅप्स या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान कमी रक्तस्राव तर काहींना जास्त रक्तस्रावाचा त्रास होतो. आज या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया पिरीयड्समध्ये किती प्रमाणात ब्लिडींग होणं नॉर्मल आहे. शिवाय मासिक पाळीतील रक्तस्रावानुसार, कसं कॅन्सरचं निदान केलं जातं.

किती रक्तस्राव नॉर्मल मानला जातो?

पिरीयड्समध्ये ३० ते ८० मिलिलीटरपर्यंत रक्तस्राव होणं नॉर्मल मानलं जातं. जर ८० मिलीलीटरपेक्षा जास्त ब्लिडींग होत असेल तर ते हेवी ब्लिडींग मानलं जातं. काही रिपोर्ट्सनुसार, नॉर्मल पिरीयड्स ब्लिडींग दर महिन्याला ३० ते ६० मिलीलीटर होतं.

Heavy periods and cancer
Causes of Asthma: काय आहेत अस्थमा होण्याची कारणं? त्रास होत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका

पिरीयड्स ब्लिडींगचं प्रमाण प्रत्येक महिलेनुसार वेगवेगळं असू शकतं. सामान्यपणे महिलांना २ ते ७ दिवसांपर्यंत ब्लिडींग होतं. ज्यामध्ये ३० मिलीलीटर नॉर्मल ब्लिडींग आणि १२० मिलीलीटर हेवी ब्लिडींग मानलं जातं. हे कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांचं लक्षण मानलं जातं.

हेवी ब्लिडींग कोणत्या कॅन्सरचं लक्षणं?

मासिक पाळीमध्ये अधिक प्रमाणात रक्तस्राव होणं हे सर्विक्स कॅन्सरचं लक्षण मानलं जातं. या कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये पिरीयड्समध्ये हेवी ब्लिडींग होऊ शकतं. याशिवाय मासिक पाळीदरम्यान अधिक रक्तस्राव होणं हे फायब्रॉईडच्या गाठीचं देखील लक्षण मानलं जातं. या गर्भाशयात होणाऱ्या नॉन कॅन्सरच्या गाठी मानल्या जातात. यामध्ये पोटदुखी आणि पाठदुखी होण्याचा धोका असतो.

Heavy periods and cancer
Mental Health: भारतातील ५१ टक्के यंग प्रोफेशनल्सचं मानसिक आरोग्य धोक्यात; 'या' कारणांमुळे स्ट्रेस वाढत असल्याचं रिपोर्टमधून समोर

पिरीयड्समध्ये हेवी ब्लिडींग होण्यामागे अनेक कारणं असतात. जसं की, हार्मोनल असंतुलन, फायब्रॉईड्स, एंडोमेट्रियोसिस. शिवाय पिरीडयड्समध्ये हेवी ब्लिडींग दरम्यान आयर्नची कमतरता, गर्भाधारणेदरम्यान समस्या, श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्याही जाणवतात.

Heavy periods and cancer
Blood Cancer : मोठी बातमी! आता फक्त ९ दिवसात ब्लड कॅन्सरचा खात्मा होणार, भारतीय डॉक्टरांना मोठं यश

काय काळजी घ्याल?

जर तुम्हाला मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्रावाची समस्या जाणवत असेल तर दर १-२ तासांनी सॅनिटरी नॅपकिन अवश्य बदला. याशिवाय जर तुम्हाला या काळात जास्त त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com