
वर्कप्लेसच्या झालेल्या बदलांमध्ये भारतातील तरूणांमध्ये तणाव आणि मानिसक समस्या वाढत असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी एक रिपोर्ट जाहीर करण्यात आला. ग्लोबल टेक्नोलॉजी कंपनी एडीपीच्या या रिपोर्टनुसार इमोशनल लँडस्केपमध्ये होणाऱ्या बदलांबाबत माहिती देण्यात आली. ज्यामध्ये स्ट्रेस लेवल जनरेशनल डिफरेंसेज स्पष्टपणे समजून येत होते.
या रिपोर्टमध्ये हे अधोरेखित करण्यात आलं आहे की, जास्त स्ट्रेल लेवल २७ ते ३९ वर्षांच्या तरूण प्रोफेशनल्समध्ये पाहायला मिळाली. ११ टक्के प्रोफेशनल्सने सांगितलं की, त्यांना हाय स्ट्रेस आहे. जो राष्ट्रीय सरासरी ९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केवळ १६-१८ वर्षांच्या ५१ टक्के लोकांनी स्ट्रेस मॅनेजमेंटबाबत माहिती दिली आहे.
दुसरीकडे ५५ ते ६४ टक्के वयातीव वृद्ध कामगारांनी स्ट्रेस मॅनेजमेंटची माहिती दिली. ज्यामध्ये ८१ टक्के कामगारांनी सांगितलं की, आठवड्यातून एकापेक्षा कमी वेळा त्यांना ताणाचा सामना करावा लागतो. कामाचं जास्त प्रेशर तरूणाईमध्ये मुख्य ट्रिगर पाहायला मिळालं. यामध्ये १८-२६ वर्षांच्या १६ टक्के लोकांनी हेवी वर्कलोक असल्याचं म्हटलंय.
याशिवाय ६७ टक्के वर्कर्सने सांगितलं की, फ्लेक्सिबल वर्किंग अरेंजमेंटसाठी त्यांना जज केलं जातं. तर ६५ टक्के लोकांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या कामावर सतत देखरेख ठेवली जाते. ज्यामुळे त्यांच्यावर प्रेशर वाढू लागतं.
एडीपी इंडिया आणि दक्षिण पूर्व एशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल गोयल यांनी सांगितलं की, "या निष्कर्षांवरून आपल्या लक्षात येतं की, सध्याचं वर्कफोर्स खासकरून तरूण कामगार कॉम्पेक्स आणि इमोशनली डिमांडिंग वर्क वातावरणात काम करतात." भारतीय कर्मचाऱ्यांचा तणावाचा स्तर २०२३ मध्ये १२ टक्क्यांपासून २०२४ मध्ये ९ टक्क्यांवर आला आहे.
गोयल यांनी पुढे सांगितलं की, फ्लेक्सिबिलिटी देणं हा केवळ समाधानाचा एक भाग आहे. कर्मचाऱ्यांचं मेंटल वेल-बीइंगला प्राधान्य देऊन कंपन्यांनी एक हेल्दीअर आणि प्रोडक्टिव वर्कफोर्सला प्रोत्साहन दिलं पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.