
एएमएच म्हणजे अँटी-म्युलेरियन संप्रेरक (AMH), आपल्याला हे ऐकून नवल वाटेल की, व्हिटॅमिनची कमतरता हे अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH) चा पातळीवर नकारात्मक परिणाम करू शकते. एएमएच हा एक असा हार्मोन आहे जो स्त्रीच्या अंडाशयातील हा हॉर्मोन स्त्रीबीजांची संख्या क्षमता दर्शवतो. एएमएच चाचणी ही प्रजनन क्षमता तपासण्याचा आणि गर्भधारणेची योजना आखण्यासाठी योग्य ठरते.
महिलेच्या गर्भाशयातील गुणवत्तापूर्ण बीजांडाच्या पेशींची संख्या दर्शविण्यासाठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो अथवा गरोदरपणात महिलेची स्त्रीबीज तयार करण्याची क्षमता यावरून समजू य शकते.
महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा प्रजनन समस्यांना तोंड द्यावं लागतं अशावेळी योग्य. व्हिटॅमिन डी, बी१२ आणि फॉलिक अॅसिड सारख्या जीवनसत्त्वांमधील कमतरता हार्मोनल संतुलन, स्त्रीबीजांची गुणवत्ता आणि एकूण प्रजनन आरोग्यावर परिणाम करतात असे आढळून आले आहे. या कमतरतेचे वेळीच निदान करून, महिलांना निरोगी एएमएच पातळी राखता येते.
२५ ते ३० वयोगटातील महिलांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता सामान्य आहे, विशेषतः ज्या महिलांना आहाराच्या चुकीच्या सवयी तसेच ज्यांच्या दैनंदिन जीवनात तणावाचे प्रमाण अधिक असते. हे पचन समस्या किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) आणि थायरॉईड विकार सारख्या परिस्थितींमुळे देखील उद्भवू शकते. लक्षणांमध्ये थकवा येणे, केस पातळ होणे, त्वचा फिकी पडणे, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि मासिक पाळीमध्ये अनियमितता दिसून येते. जर यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन, प्रजनन क्षमतेत बिघाड आणि गर्भधारणेदरम्यान किंवा प्रजनन उपचारांदरम्यान विपरीत परिणाम होतात.
पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. बुशरा खान यांनी सांगितलं की, नियमित रक्त तपासण्या, संतुलित आणि पोषक आहाराचं सेवन करणं गरजेचं आहेत. जेव्हा व्हिटॅमिन डी किंवा बी१२ सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असते, तेव्हा ते शरीराच्या एएमएचची पातळी तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते, जे महिलेची प्रजनन क्षमता समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
खराडीतील मदरहूड रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीतिका शेट्टी यांनी सांगितलं की, प्रजनन क्षमता चांगली राहावी यायासाठी महिलांनी हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं, काजू आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. व्हिटॅमिन डीची योग्य पातळी राखण्यासाठी सकाळी किमान २० मिनिटे नियमित सूर्यप्रकाश घ्यावा, योगा आणि ध्यान करून व्यायाम करावा आणि तणावाची पातळी कमी करावी, तुमची प्रजनन क्षमता जाणून घेण्यासाठी संबंधीत रक्त आणि हार्मोन तपासण्या कराव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.