White Hair: चुटकीसरशी पांढरे केस होतील काळे; मेहंदीमध्ये फक्त 'या' गोष्टी मिसळा आणि कमाल पाहाच!

White Hair Prevention tips: कमी वया तुमचेही केस पिकले आहेत का आणि सतत कलर करून तुम्हालाही कंटाळा आलाय का तर हे आर्टिकल नक्की वाचा. मेहंदीमध्ये काही गोष्टी मिसळून तुम्ही काळ्या केसांची समस्या सोडवू शकता.
White Hair
White Hairsaam tv
Published On

आजकाल जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे अनेक महिलांचे कमी वयातच केस पिकणं म्हणजेच केस पांढरे होण्याची समस्या सतावतेय. एकदा केस पांढरे झाले की, ते पुन्हा काळे करणे खूप कठीण मानलं जातं. बरेच लोक त्यांचे पांढरे केस काळे करण्यासाठी एखादी क्रीम, तेल किंवा रंग वापरतात.

सध्या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी ऑनलाइन बाजारात अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स देखील उपलब्ध आहेत. परंतु, यावर अवलंबून राहण्याऐवजी, काही घरगुती उपायांचा वापर करून केसांना कोणतेही नुकसान न होता बराच काळ काळे ठेवता येऊ शकतं.

White Hair
Bleeding Gums: दात घासताना वांरवांर हिरड्यांमधून रक्तस्राव होतोय? 'हे' ४ गंभीर आजार असू शकतात कारणीभूत

अनेकांना असं वाटतं की, पांढरे केसांवर कोणताही खात्रीशीर उपाय नाही. मात्र आज एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मेहंदीमध्ये काही गोष्टी मिसळून ती मेहंदी केलाला लावल्यास तुमचे केस काळे होऊ शकतात. फक्त मेंदी लावल्याने केस लाल होतात, जे फारसे चांगले दिसत नाही. पण, मेंदीमध्ये काही गोष्टी घातल्याने केस काळे आणि चमकदार होऊ शकतात.

यासाठी तुम्ही २०० ग्रॅम मेहंदी पावडर घ्यावी लागणार आहे. यामध्ये २-३ चमचे चहाची पावडर घालून पाण्यात उकळवा. यामुळे मेहंदीचा रंग अधिक गडद होईल. याशिवाय १-२ चमचे कॉफी पावडर घाला. कॉफी पाण्यात उकळवा, थंड होऊ द्या आणि मेहंदीमध्ये मिसळा. हे केसांना काळा रंग देण्यास मदत होते.

लिंबाचा रसही ठरेल फायदेशीर

१-२ चमचे लिंबाचा रस मेहंदीचा रंग अधिक गडद करतो. मात्र याचा वापर जास्त करू नये. कारण लिंबाच्या रसाने केस कोरडे पडण्याचा धोका अधिक असतो. २-३ चमचे दही केसांना मऊ बनवतं. दह्यामध्ये नैसर्गिक एंजाइम असतात जे केसांना मऊ बनवतात. अर्धा चमचा लवंग पावडर मेहंदीचा रंग अधिक गडद करतो. १ चमचा नारळ तेल केसांना मॉइश्चरायझ करते आणि मेहंदी लावणे सोपं होतं.

White Hair
Cancer Treatment: बेकिंग सोड्याने खरंच कॅन्सर बरा होतो? व्हायरल झालेल्या दाव्यामध्ये किती तथ्य, पाहा

हे सर्व एकत्र करून मेहंदी कशी तयार करावी?

एका भांड्यात मेहंदी पावडर घ्या आणि त्यात हळूहळू काळा चहा किंवा काढा घाला आणि घट्ट पेस्ट बनवा. आता आवळा पावडर, लिंबाचा रस, दही, लवंग पावडर, तेल आणि साखर घालून चांगले मिसळा. ही पेस्ट ६-८ तास झाकून ठेवा. हे मिश्रण एक दिवस ठेवा. तुमचे केस धुवा आणि वाळवा. नंतर मुळांपासून टोकांपर्यंत मेहंदी लावा आणि ३-४ तास तशीच राहू द्या. सुकल्यानंतर हे मिश्रण थंड पाण्याने धुवा.

White Hair
Obesity: धक्कादायक! देशभरातील ४५% किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या; पाहा कोणत्या कारणांमुळे वाढतोय पोटाचा घेर

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com