Cancer Treatment: बेकिंग सोड्याने खरंच कॅन्सर बरा होतो? व्हायरल झालेल्या दाव्यामध्ये किती तथ्य, पाहा

Baking soda cancer cure fact check: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात असा दावा केला जात आहे की, बेकिंग सोड्याच्या वापराने कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेऊया.
Baking soda cancer treatment
Baking soda cancer treatmentsaam tv
Published On

सोशल मीडियावर आजकाल अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये घरगुती उपचारांचाही समावेश असतो. सोशल मीडियावर सध्या बऱ्याच आजारांवर घरगुती उपचार कसे करावेत याबाबत माहिती दिली जाते. यामुळे लोकांमध्ये अनेकदा भ्रम निर्माण होतो. अशातच एक असा दावा समोर आला आहे की, बेकींग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेटने कॅन्सरवर उपचार केले जाऊ शकतात.

सोशल मीडियावर हा दावा करण्यात आला आहे. मात्र यामध्ये किती सत्यता आहे हे तुम्हाला माहितीये का? खरंच बेकिंग सोडा कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करू शकतो की ही केवळ एक अफवा आहे ते पाहूयात.

Baking soda cancer treatment
Ovarian cysts: महिलांच्या छोट्या चुकांमुळे होतायत अंडाशयात गाठी; कशी घ्याल काळजी?

या विचाराची सुरूवात ट्यूमर माइक्रोएनवायरनमेंटने झाली. यामध्ये शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की, कॅन्सरचा ट्यूमर स्वतःभोवती एक आम्लयुक्त वातावरण तयार करतात. असं मानलं जातं की, या आम्लतेमुळे कॅन्सरच्या पेशी वाढण्यास, शरीरात पसरण्यास आणि उपचारांचे परिणाम टाळण्यास मदत होते. बेकिंग सोडा हा अल्कधर्मी पदार्थ असल्याने, तो ट्यूमरच्या आम्लयुक्त वातावरणाचे संतुलन राखू शकतो आणि कॅन्सरची प्रगती मंदावू शकतो असा सिद्धांत मांडण्यात आला होता.

संशोधनातून काय समोर आलं?

लॅब आणि प्राण्यांवर केलल्या अभ्यासातून काही सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरवरील एका अभ्यासात, बेकिंग सोड्याने कॅन्सरचं आम्लयुक्त वातावरण कमी केलं, ज्यामुळे केमोथेरपी औषधं अधिक प्रभावी झाल्याचं पाहायला मिळालं. ते काही रोगप्रतिकारक पेशींना कॅन्सरशी लढण्यास मदत करत असल्याचं दिसून आलं. मात्र हे सर्व इन विट्रो (प्रयोगशाळेत) किंवा इन व्हिव्हो (प्राण्यांवर) केलेल्या संशोधनामध्ये पाहायला मिळालं.

Baking soda cancer treatment
Hair Transplant: हेअर ट्रान्सप्लांट बनलं मृत्यूचं कारण; पाहा कोणत्या व्यक्तींनी 'ही' ट्रीटमेंट चुकूनही करू नये?

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, बेकिंग सोडा स्वतः उपचार म्हणून करणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलन, किडनीच्या समस्या आणि पचनसंस्थेच्या समस्या उद्भवू शकतात. लोक अशा खोट्या दाव्यांवर अवलंबून राहतात ही सर्वात मोठी भीती आहे. अनेकदा यामुळे आजार आणखी वाढू शकतो.

Baking soda cancer treatment
Why women feel colder: पुरुषांच्या तुलनेत महिलांना का थंडी जास्त लागते?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com