Hair Transplant: हेअर ट्रान्सप्लांट बनलं मृत्यूचं कारण; पाहा कोणत्या व्यक्तींनी 'ही' ट्रीटमेंट चुकूनही करू नये?

Hair Transplant: कानपूरमधील एका इंजिनीयर व्यक्तीने केस गळतीमुळे हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय या ३७ वर्षीय व्यक्तींच्या जीवावर बेतला. या प्रक्रियेनंतर या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
Hair Transplant
Hair Transplantsaam tv
Published On

केस गळती ही आजकाल अनेकांची समस्या आहे. चुकीची लाईफस्टाईल आणि पोषणाच्या अभावामुळे केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी अकाली केस जाण्याचा धोका टळावा यासाठी लोकं हेअर ट्रान्सप्लांटचा पर्याय अवलंबतात. संपूर्ण केस गळतीकर पुन्हा केस उगवण्याच्या प्रक्रियेला हेअर ट्रान्सप्लांट म्हटलं जातं.

असंच नुकतंच एका कानपूरमधील इंजिनीयर व्यक्तीने केस ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विनीत दुबे यांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली. विनीत हा गोरखपूरमध्ये राहणारा होता आणि त्याने अलीकडेच एचबीटीआय कानपूरमधून पीएचडी पूर्ण केली होती. हेअर ट्रान्सप्लांटनंतर विनीतचा संपूर्ण चेहरा सुजला होता. जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा विनीतला कानपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण संसर्ग त्याच्या शरीरात पसरला होता आणि त्याचा मृत्यू झाला.

जर तुम्ही अधिक प्रमाणात केसगळतीच्या समस्येला बळी पडला असाल आणि तुम्हीही हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करत असाल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे. काही लोकांना ही प्रक्रिया करताना साईड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहूयात.

हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय?

हेअर ट्रान्सप्लांटमध्ये प्लास्टिक किंवा त्वचारोगतज्ज्ञ सर्जन डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागात हीव प्रक्रिया करतात. या प्रक्रियेत सर्जन डोक्याच्या मागच्या किंवा बाजूच्या केसांचं प्रत्यारोपण डोक्याच्या पुढच्या किंवा वरच्या भागात करतो. हेअर ट्रान्सप्लांट सहसा भूल देऊन केलं जातं.

Hair Transplant
Cerebral veins: मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसून येतात 'हे' बदल; सामान्य समजून इग्नोर करू नका

किती पद्धतींचं असतं हेअर ट्रान्सप्लांट?

हेअर ट्रान्सप्लांट दोन पद्धतींचं असतं. यामध्ये स्लिट ग्राफ्ट आणि मायक्रोग्राफ्ट यांचा समावेश असतो. स्लिट ग्राफ्टच्या प्रत्येत ग्राफ्टमध्ये ४-१० केस असतंत. तर कवरेज म्हणून मायक्रोग्राफ्टच्या प्रत्येक ग्राफ्टमध्ये १-२ केस असतात.

हेअर ट्रान्सप्लांनंतर कोणत्या समस्या येतात?

साधारणपणे हेअर ट्रान्सप्लांटचे साईड इफेक्ट्स कमी असतात. यामध्ये खाली दिलेल्या समस्या उद्भवू शकतात.

  • रक्तस्राव

  • इन्फेक्शन

  • डोक्याची त्वचा सूजणं

  • डोळ्यांच्या जवळ काळं-नीळ होणं

  • ट्रान्सप्लांट केलेला भाग सुन्न होणं

  • खाज येणं

Hair Transplant
Japanese Technique Of Walking: 10,000 पावलं चालण्यापेक्षाही चांगले रिझल्ट्स देईल जपानी वॉकिंग टेकनिक; डॉक्टरांनी सांगितली वॉकिंगची पद्धत

कोणत्या व्यक्तींनी करू नये हेअर ट्रान्सप्लांट?

  • औषधं किंवा किमोथेरेपीमुळे केस गेले असतील

  • डोक्यावर दुखापत झाली असेल किंवा शस्त्राक्रियेची खूण असेल

Hair Transplant
Cancer Detection: एका सोप्या Blood Test ने ओळखता येणार कॅन्सर; पाहा कशी काम करते ही टेस्ट?

हेअर ट्रान्सप्लांटनंतर काय काळजी घ्यावी?

  • ही प्रक्रिया शस्त्रक्रिया प्रोटोकॉल असलेल्या मान्यताप्राप्त आणि चांगल्या ठिकाणीच करावी.

  • केस प्रत्यारोपण करताना हे लक्षात ठेवा की ही शस्त्रक्रिया केवळ परवानाधारक पात्र डॉक्टरांनीच केली पाहिजे.

  • प्रक्रियेचा सुरक्षित आणि प्रभावी निकाल सुनिश्चित करण्यासाठी नियमित फॉलो-अप प्रोटोकॉलचे पालन करा.

  • हेअर ट्रान्सप्लांटपूर्वी, तुम्हाला त्या तंत्रांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रांचा वापर केला जातो. तुमच्यासाठी कोणते तंत्रज्ञान चांगले आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com