
कॅन्सर एक गंभीर आजार असून या आजाराच्या नावानेच अनेक जणांना भीती वाटते. मात्र आता मेडिकल सायन्स इतकं विकसीत झालंय की, हा आजार उपचारांद्वारे बरा होऊ शकतो. यावर वेळीच उपचार केले की व्यक्तीचा जीवही वाचतो. मात्र कॅन्सरचं निदान अनेकदा उशिरा होतं परिणामी वेळेवर उपचार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, 'लिक्विड बायोप्सी' ही यासाठी एक उत्तम टेस्ट ठरू शकते.
लिक्विड बायोप्सी ही साध्या ब्लड टेस्टप्रमाणे आहे. जी केवळ कॅन्सर ओळखण्यास मदत करत नाही तर कोणता उपचार सर्वोत्तम असेल हे जाणून घेण्यास मदत होते. ही टेस्ट नेमकी काय आहे आणि कशी करू शकता याची माहिती या आर्टिकलच्या माध्यमातून घेऊया.
लिक्विड बायोप्सी ही एक अशी टेस्ट आहे ज्यामध्ये रक्त किंवा इतर द्रवपदार्थांद्वारे शरीरात कॅन्सरची उपस्थिती शोधली जाते. मुख्य म्हणजे ही पारंपारिक बायोप्सीइतकी वेदनादायी नाही. कारण त्यासाठी शरीराचा कोणताही भाग कापण्याची किंवा सुई टोचण्याची आवश्यकता नसते.
जेव्हा कॅन्सर शरीरात असतो तेव्हा तो रक्तात छोटे जेनेटीक अंश सोडतो. हे ट्यूमरमधील डीएनए, ट्यूमरपासून विभक्त झालेल्या पेशी किंवा सामान्य आणि कॅन्सर पेशींमधील डीएनए असू शकते. अशा परिस्थितीत त्यांची तपासणी करून डॉक्टर शरीरात कॅन्सर आहे की नाही, तो कोणत्या प्रकारचा आहे आणि कोणता उपचार चांगला असेल हे शोधू शकतात.
ही चाचणी कॅन्सरचा धोका वाढवणारे काही विशिष्ट जीन म्यूटेशन (जसं की BRCA1, TP53) देखील ओळखू शकतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजेच पांढऱ्या रक्त पेशी, कॅन्सरला कशी प्रतिक्रिया देतात यावर काही रिसर्च सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.