Why women feel colder: पुरुषांच्या तुलनेत महिलांना का थंडी जास्त लागते?

Women Feel Colder Than Men: महिलांना पुरुषांपेक्षा थंडी जास्त वाजते हे तुम्हाला माहिती आहे का? यामागील वैज्ञानिक आणि हार्मोनल कारण जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल वाचा.
Why women feel colder
Why women feel coldersaam tv
Published On

सध्या वातावरणात प्रचंड बदल झालेला आहे. ऑफिसमध्ये एसी असल्याने प्रचंड गारवा लागतो तर ऑफिसबाहेर पडलं की नुसत्या घामाच्या धारा. मात्र ऑफिसमध्ये काहींना एसीच्या थंड हवेत आरामा वाटतो. तर दुसऱीकडे काहींना कुडकुडणारी थंडी वाजते. मात्र तुम्ही कधी नोटीस केलंय का की, पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्रमाणात थंडी वाजते.

महिलांचं मेटाबॉलिझ्म वेगळं असतं

एकंदरीत पाहिलं तर महिलांचा बेसल मेटाबॉलिक रेट पुरुषांपेक्षा थोडा कमी असतो. म्हणजेच शरीर इतक्या वेगाने ऊर्जा निर्माण करू शकत नाही. चयापचय जितकी मंद प्रमाणात असेल तितकी शरीरात उष्णता कमी निर्माण होते.

फॅटमुळेही होतो परिणाम

महिलांच्या शरीरामध्ये पुरुषांच्या तुलनेत फॅट म्हणजेच त्वचेच्या खाली चरबी जास्त प्रमाणात असते. ही चरबी शरीराला उष्णता आत ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे हात आणि पाय थंड वाटू लागतात.

Why women feel colder
Hair Transplant: हेअर ट्रान्सप्लांट बनलं मृत्यूचं कारण; पाहा कोणत्या व्यक्तींनी 'ही' ट्रीटमेंट चुकूनही करू नये?

ब्लड फ्लो आणि हार्मोनचं कनेक्शन नेमकं काय?

महिलांमध्ये, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांच्यासारखे हार्मोन्स शरीराच्या तापमानावर परिणाम करतात. यावेळी थंड हवामानात हे हार्मोन्स शरीराच्या बाहेरील भागात रक्त प्रवाह कमी करतात. ज्यामुळे अधिक प्रमाणात गार लागू शकतं.

शरीराचं तापमान कसं मॅनेज करावं?

पुरुष आणि स्त्रियांच्या शरीर प्रणाली वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. पुरुषांचे शरीर शरीराचे मूळ तापमान राखण्यासाठी जास्त उष्णता निर्माण करते, तर महिलांचे शरीर जास्त उष्णता साठवते.

Why women feel colder
Ovarian cysts: महिलांच्या छोट्या चुकांमुळे होतायत अंडाशयात गाठी; कशी घ्याल काळजी?

मानसिक कारणामुळे सर्दी होऊ शकते

माहितीनुसार, महिला थंडीबद्दल अधिक संवेदनशील असतात. म्हणजेच, पुरुषांना समान तापमान सामान्य वाटेल, परंतु महिलांना त्यावेळी थंडी जास्त जाणवू शकते. महिलांच्या शरीराची रचना, हार्मोन्स आणि त्यांचा रक्तप्रवाह यामुळे त्यांना थंडी जाणवते.

Why women feel colder
Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या २ दिवसांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणं; वेळीच व्हा सतर्क

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com