Brain tumor: निरोगी व्यक्तींमध्येही दिसतात ब्रेन ट्यूमरची ४ लक्षणं; दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

Brain tumor symptoms: ब्रेन ट्यूमर ही एक जीवघेणी स्थिती असू शकते. जर याचं वेळेवर निदान आणि उपचार झाले तर रूग्णाचा जीव वाचू शकतो. याची काही लक्षणं जाणून घ्या जी दुर्लक्षित करू नयेत.
Brain tumor symptoms
Brain tumor symptomssaam tv
Published On

चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या ब्रेन ट्यूमरच्या प्रकरणांमध्ये स्पष्ट वाढ होताना दिसतेय. बदलती जीवनशैली, वाढता ताण, प्रदूषण आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा जास्त वापर ही त्याची संभाव्य कारणं मानली जातायत. कधीकधी त्याची लक्षणं इतकी सामान्य असतात की, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ब्रेन ट्यूमर ही एक गंभीर परिस्थिती असून सुरुवातीच्या स्टेजमध्ये याची काही लक्षणं दिसून येतात. जेव्हा मेंदूच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. ब्रेन ट्यूमरची लक्षणे हळूहळू विकसित होऊ शकतात आणि अनेकदा दुर्लक्षित केली जातात. ही लक्षणं कोणती आहेत ते पाहूयात.

सतत डोकेदुखी

ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी. पण ही डोकेदुखी सामान्य नसते. यामध्ये डोकेदुखी सकाळी तीव्र असते आणि कालांतराने वाढू लागते. जर तुम्हालाही अशा वेदना होत असतील आणि औषध घेतल्यानंतरही डोकेदुखी कमी होत नसेल, तर हे एक लक्षण असू शकतं.

Brain tumor symptoms
Earwax accumulation : कानात सतत घाण का जमा होते? कान साफ करण्याची घरगुती आणि सोप्या पद्धती

दृष्टीसंबंधी समस्या

जर तुमची दृष्टी अचानक अंधुक झाली किंवा तुम्हाला धुसरं दिसू लागलं तर हा ब्रेन ट्यूमरच्या दाबाचा परिणाम असू शकतो. मेंदूच्या ज्या भागात ट्यूमर तयार होतो त्या भागातील नसांवर दाब पडल्याने डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

बोलण्यात किंवा ऐकण्यात समस्या

जर कोणा व्यक्तीला बोलण्यामध्ये समस्या जाणवत असतील किंवा समोरची व्यक्ती काय म्हणतेय हे समजत नसेल तर हे मेंदूतील समस्येचं लक्षण असू शकतं. हे ब्रेन ट्यूमर, स्ट्रोक किंवा कोणत्याही न्यूरोलॉजिकल समस्येचं लक्षणं मानलं जातं.

Brain tumor symptoms
Cerebral edema: मेंदूच्या नसा फुगल्यावर शरीर देतं खास संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा जीव गमवाल

मसल्स कमकुवत होणं

ब्रेन ट्यूमरमुळे शरीराच्या हालचालींवरही परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला अचानक तुमच्या हातपायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल किंवा चालताना तोल जात असेल तर हे मेंदूच्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं.

Brain tumor symptoms
Leg Vein Blockage: पायाच्या ब्लॉक नसा उघडण्यासाठी सोपे ४ उपाय; वेदनेपासूनही मिळेल त्वरित आराम

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com