
ब्रेन ट्युमर म्हणजे मेंदूमध्ये पेशींचं असामान्य वाढ होत असते. हे ट्युमर सौम्य (नॉन-कॅन्सरस) असू शकतात किंवा घातक (कॅन्सरस) देखील होऊ शकतात. पण कोणत्याही प्रकारचा मेंदूचा ट्युमर हा वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असतो. याचाच अर्थ त्याला वैद्यकीय मदत घेण्याची गरज असते. त्यामुळे लक्षणं दिसताच तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं.
ब्रेन ट्युमरचं निदान सुरुवातीला कठीण असतं, कारण त्याची लक्षणं सामान्य आजारांसारखीच वाटतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या सूचक बदलांकडे दुर्लक्ष करू नका. खाली अशा पाच प्रमुख लक्षणांबद्दल माहिती दिली आहे जी सुरुवातीच्या टप्प्यावर ब्रेन ट्युमरची शक्यता दर्शवू शकतात.
ब्रेन ट्युमरचं सर्वात सामान्य आणि सुरुवातीचं लक्षण म्हणजे सततचं आणि न थांबणारं डोकेदुखी. ही डोकेदुखी सामान्य नसते.
या वेदना मुख्यतः पहाटे किंवा सकाळी उठल्यावर जास्त तीव्र होतात.
डोक्यात जडपणा किंवा दाब जाणवतो. कधी थोडी धडधडही असते.
खोकताना, वाकताना किंवा अचानक हालचाल केल्यावर वेदना वाढते.
सामान्य पेनकिलर्स यामुळे काहीही फरक पडत नाही.
डोकेदुखीला मळमळ किंवा उलटीसारखी लक्षणंही साथ देतात.
हे लक्षण ट्युमरमुळे मेंदूवर किंवा कवटीतील भागावर होणाऱ्या दाबामुळे निर्माण होतं.
मेंदूमध्ये जिथे दृष्टी आणि ऐकण्याचे केंद्र असतात. त्या ठिकाणं जर ट्युमर असेल तर खालील लक्षणं दिसून येतात.
धूसर दिसणं, डोळ्यांपुढे एकाऐवजी दोन वस्तू दिसणं (डबल व्हिजन), किंवा बाजूची दृष्टी कमी होणं.
ऐकण्यात अडचण, एकाच कानात सतत आवाज येणं, किंवा कान भरल्यासारखं वाटणं.
हे सगळं ट्युमरचा त्या संबंधित नसा किंवा मेंदूच्या भागावर होणाऱ्या दाबामुळे होतं.
शरीराच्या एका बाजूला, विशेषतः चेहरा, हात किंवा पायांमध्ये अचानक कमजोरी किंवा बधीरपणा जाणवणे, हे लक्षात घेण्यासारखं लक्षण आहे. यासोबतच ही लक्षणंही दिसून येतात.
चालताना तोल जातो, पाय अडखळतात.
रोजच्या साध्या हालचाली उदा. बटण लावणं, लिहिणं करताना अडचण येणं.
मेंदूमध्ये हालचाली आणि समतोल नियंत्रित करणाऱ्या भागांवर ट्युमर असल्यास ही लक्षणं दिसतात.
कोणतीही पूर्व इतिहास नसताना अचानक फिट्स येणं हे ब्रेन ट्युमरचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. यामध्ये ही खाली दिलेली लक्षणं पाहायला मिळतात.
हातापायांना झटके येतात.
शरीर अचानक आकडून जातं किंवा एका दिशेला सतत हालचाल होते.
काही वेळांसाठी नजर स्थिर राहते.
ब्रेन ट्युमर हळूहळू मानसिक प्रक्रियांवर प्रभाव टाकू शकतो. सुरुवातीला सौम्य वाटणारे खालील बदल त्याचे संकेत असू शकतात
लक्ष न लागणं, सतत विसरभोळेपणा.
रोजच्या कामात गोंधळ, समज न होणं.
चिडचिड, नैराश्य, अनावश्यक राग, मूड स्विंग्स.
बोलताना अडखळणं, योग्य शब्द आठवत न येणं, किंवा एखादी गोष्ट नीट समजून न घेणं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.