Mouth symptoms heart attack: तुमच्या तोंडामध्ये दिसतात 'ही' ६ लक्षणं देतात हार्ट अटॅक येण्याचे संकेत; इग्नोर करणं ठरेल धोकादायक

Heart disease and oral health: काहीवेळा शरीरातील इतर अवयवांमध्येही विशेषतः तोंडात काही बदल दिसू शकतात जे हृदयविकार किंवा त्याच्याशी संबंधित समस्यांशी जोडलेले असू शकतात.
Heart disease and oral health
Heart disease and oral healthsaam tv
Published On

आजकालची जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि तणाव यामुळे अनेक लोक आजारी पडतायत. यामध्ये लठ्ठपणा, डायबेटीस आणि हृदयविकारांचा धोका वाढतोय. शरीरात काही आजार होत असला की, त्याची काही सुरुवातीची लक्षणं दिसायला लागतात. यामध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं आणि हृदयाच्याही समस्या त्याला अपवाद नाहीत.

पण हृदयाशी संबंधित त्रास फक्त छातीत दुखणं किंवा थकवा एवढ्यावरच थांबत नाहीत. कधी कधी हृदय कमजोर होण्याचे संकेत आपल्याला तोंडातून मिळतात. यामध्ये तुमचे दात, हिरड्या आणि श्वासामधूनही.

Heart disease and oral health
Kidney failure symptoms on legs: पायांवर 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब होतेय; बदल लक्षात घेऊन लगेच उपचार घ्या

सतत हिरड्यांमधून रक्त येणं

जर तुमच्या हिरड्या सतत लालसर, सुजलेल्या असतील आणि थोडक्यात सुद्धा रक्त येत असेल, तर हे केवळ दातांचे प्रॉब्लेम नाही तर हृदय विकाराचा इशारा असू शकतो. हिरड्यांमध्ये असलेले जंतू तुमच्या रक्तातून हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

Heart disease and oral health
Early signs of lung cancer : फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

दात हलणं किंवा गळून पडणं

कोणतीही मोठी दुखापत किंवा कारण नसताना जर तुमचे दात हळूहळू हलू लागले किंवा पडू लागले तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सूजेमुळे होऊ शकतं. अशा सूजेमुळे हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

तोंडातून दुर्गंधी येणं

जर तुम्ही दररोज ब्रश करत असाल, तरीही तुमच्या तोंडातून वास येत असेल तर तुमचं शरीर काहीतरी संकेत देतंय. अनेक वेळा ही दुर्गंधी शरीरातल्या आतील सूजेमुळे किंवा इन्फेक्शनमुळे होते. आणि ही सूज हृदयासाठी धोका बनू शकते.

Heart disease and oral health
Early symptoms of brain cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात सुरुवातीला होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

तोंडातील जखमा होणं

जर तुम्हाला सतत तोंड येत असेल किंवा एखादी झालेली जखम बरी होण्यासाठी खूप वेळ लागत असेल, तर हे शरीराच्या कमजोरीचं आणि खराब रक्तप्रवाहाचं संकेत असू शकतं. खराब ब्लड सर्क्युलेशन हृदयावर परिणाम करतं.

तोंड कोरडं पडणं

जर तुमचं तोंड सातत कोरडं पडत असेल किंवा लाळेची कमतरता जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा रक्तप्रवाह नीट न चालल्याने हृदयावर ताण येतो. काही वेळा ही अवस्था काही औषधांमुळे देखील होते.

जबड्यांमध्ये अचानक वेदना होणं

जर अचानक खालच्या जबड्यात वेदना जाणवू लागल्या आणि त्या वेदना गळा किंवा छातीपर्यंत पसरत असतील, तर हे लक्षण खूपच गंभीर असू शकतं. विशेषतः महिलांमध्ये हे हार्ट अटॅकचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com