Kidney failure symptoms on legs: पायांवर 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब होतेय; बदल लक्षात घेऊन लगेच उपचार घ्या

Leg symptoms of kidney disease: किडनीचे आजार अनेकदा सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत, पण काहीवेळा तुमच्या पायांवर दिसणारे बदल तुम्हाला या गंभीर स्थितीबद्दल संकेत देऊ शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते.
Kidney failure symptoms on legs
Kidney failure symptoms on legssaam tv
Published On

आपल्याला जाणवणाऱ्या प्रत्येक समस्येचं लक्षण शरीर आपल्याला देत असतं. आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. यामध्ये किडनीसंदर्भातील आजारांमध्येही वाढ झाली आहे. मात्र तुम्हाला माहितीये का जर तुमची किडनी खराब होत असेल तर त्याची लक्षणं तुमच्या पायांमध्ये दिसून येतात.

किडनी शरीरात खालच्या बाजूस नसल्या तरी, जेव्हा त्या नीट काम करत नाहीत, तेव्हा त्याचे काही संकेत पायांतून दिसायला लागतात. याची कोणती पाच लक्षणं तुम्ही ओळखली पाहिजेत ते पाहूयात. ही लक्षणं ओळखून तुम्ही वेळेत डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

पायाच्या घोट्यांभोवती सूज येणं

जर संध्याकाळी पायांभोवती सूज दिसत असेल आणि त्यांच्या खुणा खोलवर जाणवत असतील, तर ही किडनी नीट काम करत नसल्याची सुरुवातीची खूण असू शकते. किडनीचं एक महत्त्वाचं काम म्हणजे शरीरातील अतिरिक्त मीठ आणि पाणी बाहेर टाकणं. जेव्हा या प्रक्रियेत अडथळा येतो, तेव्हा हे पाणी घोट्यांमध्ये साचायला लागतं. ही सूज इतर कारणांनीही येऊ शकते.

पायावर खाज येणं

जर पायावर सतत खाज येत असेल, विशेषत: पायाच्या मांडीखालच्या भागात आणि त्वचेला कोरडेपणा, पुरळ किंवा रॅश काहीच नसेल तर ही खाज शरीराच्या अंतर्गत कारणांमुळे होत असते. जेव्हा किडनी नीट साफ करत नाहीत तेव्हा रक्तात काही टॉक्सिन पदार्थ साचायला लागतात, ज्यामुळे ही खाज आतून निर्माण होते.

Kidney failure symptoms on legs
Early signs of lung cancer : फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

रात्री झोपेत पायात क्रॅम्प येणं

जर झोपेत किंवा विश्रांती घेत असताना पायात क्रॅम्प येत असतील किंवा स्नायू अचानक आकुंचन पावत असतील तर त्याचं कारण किडनीशी जोडलेलं असू शकतं. आपले स्नायू पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम यांचं संतुलन योग्य असल्यावरच नीट काम करतात.

पायांच्या त्वचेचा रंग बदलणं

पायाच्या बोटांवर किंवा टाचांभोवती जर हळूहळू काळसर किंवा निळसर रंग दिसायला लागला तर हे देखील किडनीचा लक्षण असू शकतं. किडनीची समस्या वाढू लागली की, शरीरातील रक्ताभिसरण कमी होतं आणि त्यामुळे पायांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे त्या भागात सौम्य रंग बदल होतो.

Kidney failure symptoms on legs
Early symptoms of brain cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात सुरुवातीला होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

पायांमध्ये सुन्नपणा जाणवणं

कधीही एकदम पाय सुन्न होणं, झिणझिण्या येणं किंवा सुई टोचल्यासारखं वाटणं असं होत असेल तर ते नसांच्या कार्यावर परिणाम होतोय याचा संकेत आहे. किडनी केवळ रक्त शुद्ध करत नाही, तर शरीरात इलेक्ट्रोलाइटचं संतुलन आणि नसांची निगा राखणं हे कामही करत असतात. जेव्हा हे संतुलन बिघडतं, तेव्हा नसांवर परिणाम होतो तेव्हा सुन्नपणा जाणवू शकतो.

Kidney failure symptoms on legs
Early symptoms of pancreatic cancer : स्वादुपिंडाचा कॅन्सर होत असताना शरीरात होतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com