Early symptoms of Heart blockage: हृदयाच्या नसांमध्ये प्लाक जमल्यावर शरीरात होतात हे बदल; हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी व्हा सावध

Heart blockage warning signs: आपल्याला काही समस्या झाल्यास शरीर आपल्याला त्याचे संकेत देतं. असंच चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या आपल्या मागे लागतात. यावेळी हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात ते पाहूयात.
Early symptoms of Heart blockage
Early symptoms of Heart blockagesaam tv
Published On

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की त्याला वैद्यकीय भाषेत कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) म्हटलं जातं. ही परिस्थिती आजच्या काळात एक सामान्य समस्या बनत चालली आहे. रक्तवाहिन्यांवर कोलेस्ट्रॉल आणि चरबी जमा झाल्यामुळे हा अडथळा निर्माण होतो ज्याला प्लाक अस म्हणतात.

हा अडथळा कमी किंवा पूर्ण प्रमाणात असू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत ब्लड टेस्ट, ईसीजी आणि अँजिओग्राफी या आजाराबाबतची अचूक माहिती देतात. परंतु काही लक्षणे अशी आहेत जी घरी ओळखता येतात. हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर सुरुवातीला कोणती लक्षणं दिसून ते पाहूयात.

छातीत जडपणा वाटणं

हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येण्याचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा जडपणा वाटणं. ही वेदना छातीवर दाब, घट्टपणा किंवा भार असल्यासारखी वाटू शकते. यामध्ये संबंधित व्यक्तीच्या हृदयाला पुरेसं ऑक्सिजनयुक्त रक्त न मिळत नाही. हे लक्षण दिसल्यास याकडे दुर्लक्ष करू नये.

Early symptoms of Heart blockage
Heart arteries thickening signals: हृदयाच्या नसा जाड होऊ लागल्यास शरीर देतं 'हे' संकेत; हार्ट अटॅक येण्यापूर्वी धोका ओळखा

जबडा आणि मानेपर्यंत वेदना होणं

हृदयरोगाच्या वेदना नेहमीच छातीपुरत्या मर्यादित नसतात. वेदना जबड्यात, डावा हात, खांदा, मान, पाठ किंवा पोटाच्या वरच्या भागात देखील पसरू शकतात. कारण या अवयवांच्या नसा हृदयाशी जोडलेल्या असतात. जर तुम्हाला अशा वेदना होत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

थकवा

जर तुम्हाला थोडेसे कष्ट करूनही श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा साधी कामं करूनही थकवा जाणवत असेल, तर हे हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होण्याचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी हृदयाला पुरेसं रक्त मिळत नाही तेव्हा हा त्रास होऊ शकतो.

Early symptoms of Heart blockage
Bad cholesterol facial signs: नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढल्यास चेहऱ्यावर दिसतात 'हे' संकेत; चुकूनही दुर्लक्ष करू नका

काय काळजी घ्यावी?

कधीकधी हृदयरोग कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो, ज्याला 'सायलेंट हार्ट डिसीज' म्हणतात. अशा परिस्थितीत अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. विशेषतः जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धुम्रपानाची सवय असेल किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर नियमित तपासणी करणं खूप महत्वाचं आहे.

Early symptoms of Heart blockage
Liver damage Early symptoms: लिव्हर खराब झाल्यावर शरीरात दिसतात ५ मोठे बदल; सामान्य समजून अनेकजण करतात दुर्लक्ष

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com