
आजकाल चुकीची जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर आहारामुळे लोकांना हृदयाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल होणं. या दोन्ही स्थिती प्राणघातक ठरू शकतात. याशिवाय अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला हृदयाच्या नसांशी संबंधित तक्रारीही जाणवतात. आज आपण थिक हार्ट सिंड्रोमबद्दल (Thick Heart Syndrome) जाणून घेणार आहोत.
थिक हार्ट सिंड्रोमला लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी (LVH) असंही म्हटलं जातं. या स्थितीत हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलचं जाड होऊ लागतं. मुख्य म्हणजे या ठिकाणी रक्त पंप होण्याचं काम केलं जातं. हृदयाच्या स्नायूंच्या जाडपणामुळे ते योग्य पद्धतीने पंप करू शकत नाही. अशा परिस्थितीत, व्यक्तीला थकवा, श्वास लागणं, अनियमित हृदयाचे ठोके आणि अगदी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
थिक हार्ट सिंड्रोम दरम्यान हृदयाचे स्नायू असामान्यपणे जाड होऊ लागतात. या स्थितीमुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. या स्थितीची अनेक कारणं असू शकतात. मात्र हा त्रास झाल्यावर काय लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.
छातीत दुखणं किंवा दाब येणं
श्वास घेण्यात अडचण
थकवा
अनियमित हृदयाचा ठोका
बेशुद्धी
जर तुम्हाला तुमच्या शरीरात ही लक्षणं दिसली तर ती सामान्य आहेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे शरीराला हृदयरोगासह अनेक समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता असते.
थिक हार्ट सिंड्रोमची स्थिती धोकादायक असू शकते, कारण हा आजार सहज ओळखता येत नाही. अशा परिस्थितीत बरेच लोक नकळत या आजारासोबत जगतात जोपर्यंत त्यांच्या शरीरात समस्या निर्माण होऊ शकत नाहीत. थिक हार्ट सिंड्रोम धोकादायक असू शकतो कारण तो सहज ओळखता येत नाही.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.