
मेंदूसंदर्भातील कोणतीही परिस्थिती ही गंभीर मानली जाते. यामध्ये हाइड्रोसेफेलस (Hydrocephalus) ही एक गंभीर न्यूरोलॉजिकल कंडीशन आहे. ज्यामध्ये मेंदूमध्ये जास्त प्रमाणात द्रव म्हणजेच सेरेब्रल स्पाइनल फ्लुइड जमा होऊ लागतं. सोप्या भाषेत याला मेंदूमध्ये पाणी जमा होणं असंही म्हटलं जातं. हा द्रव मेंदूच्या आत वेंट्रिकल्स म्हणजेच पोकळ्या निर्माण करतो. ज्यामुळे मेंदूवर दबाव वाढू लागतो.
मेंदूच्या समस्या या खासकरून मोठ्या वयातील किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये दिसून येतात. मात्र ही समस्या नवजात बाळापासून ते वृद्धापर्यंत कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकते. अशा परिस्थितीत त्याची लक्षणं जाणून घेणं गरजेचं असतं. जर याची वेळेत लक्षणं ओखळली तर उपचार लवकर मिळण्यास मदत होते.
मेंदूतील द्रवपदार्थाचा (CSF) प्रवाह थांबतो किंवा जास्त प्रमाणात वाहू लागतो तेव्हा हायड्रोसेफलस होतो. हा द्रव मेंदू आणि पाठीच्या कण्याला संरक्षण देतो. ज्याची पातळी दुखापत, संसर्ग, ट्यूमर किंवा स्ट्रोकनंतर बिघडू शकते. कधीकधी ही समस्या जन्माच्या वेळी उद्भवण्याचाही धोका असतो.
जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सावध व्हा. कारण वारंवार आणि तीव्र डोकेदुखी, विशेषतः सकाळी, हे हायड्रोसेफलसचे प्रारंभिक लक्षण असू शकतं. मेंदूवर वाढत्या दाबामुळे ही वेदना होते.
जर तुम्हाला डोकेदुखीसोबत मळमळ आणि उलट्या जाणवत असतील तर हे देखील या समस्येचं लक्षण आहे. मेंदूतील द्रवपदार्थाचा दाब सामान्यपेक्षा जास्त असल्याचं हे लक्षण असू शकतं.
मेंदूवरील वाढत्या दाबामुळे डोळ्यांच्या नसांवर परिणाम होण्याचा धोका असतो. यावेळी ज्यामुळे अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी किंवा डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये असामान्यता येऊ शकते. त्यामुळे हा त्रास होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. यावेळी रूग्णाला पाय जड वाटू लागणं किंवा संतुलन राखणं कठीण होऊ शकतं. हे लक्षण हायड्रोसेफलसचे लक्षण असू शकतं. हा त्रास खासकरून वृद्धांमध्ये दिसून येतो.
शस्त्रक्रिया किंवा शंट सिस्टीमच्या मदतीने हायड्रोसेफलसवर वेळेवर उपचार करता येणं शक्य आहे. जर त्याची कोणतीही लक्षणं कायम राहिली तर ताबडतोब डॉक्टरांची मदत घेणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. या विलंबामुळे मेंदूचं कायमचं नुकसान होण्याची शक्यता असते.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.