Liver damage Early symptoms: लिव्हर खराब झाल्यावर शरीरात दिसतात ५ मोठे बदल; सामान्य समजून अनेकजण करतात दुर्लक्ष

Recognizing liver problems: सुरुवातीची लक्षणं वेळेवर ओळखल्यास उपचार प्रभावी ठरू शकतात. शिवाय यामुळे जीव देखील वाचू शकतो. यकृत आजारांची सुरुवात दर्शवणारी ही 5 महत्त्वाची लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.
Liver damage Early symptoms
Liver damage Early symptomsSAAM TV
Published On

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो. यामध्ये लिव्हर म्हणजे यकृताचा देखील समावेश आहे. आपल्या शरीरातील यकृत हे जवळपास ५०० हून अधिक आवश्यक कामं करत असतं. यामध्ये विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकणं, पोषक तत्त्वांचं रूपांतरण, आणि पचनासाठी पित्त तयार करणं यांचा समावेश आहे.

आजकालच्या जीवनशैलीमुळे आज जगभरात अनेकजण यकृताच्या आजारांनी त्रस्त आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतेय. यकृताच्या आजारांची लक्षणं फार सौम्य असतात. त्यामुळे लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र यकृताच्या आजारांची वेळेत ओळख होण्यात विलंब होतो. जसं की हिपॅटायटिस, फॅटी लिव्हर आजार किंवा सिरॉसिस.

सतत थकवा आणि अशक्तपणा

जर तुम्हाला सतत आराम केला तरी नेहमी थकल्यासारखं वाटत असेल तर तुमचं यकृत योग्य प्रकारे काम करत नाही. यामुळे शरीरात ऊर्जा तयार होण्यात अडथळा येतो आणि त्यातूनच थकवा जाणवतो.

पोटदुखी

पोटाच्या उजव्या वरच्या भागात दुखणं हे लिव्हरच्या समस्यांचं एक लक्षण मानलं जातं. काही वेळा पोटात पाणी साचल्याने (ascites) ते फुगलेलं दिसू शकते. अनेक वेळा हे गॅस, अपचन किंवा अति खाल्लं म्हणून दुर्लक्षित केलं जातं.

Liver damage Early symptoms
Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

कावीळ

त्वचेत आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागात पिवळसरपणा दिसल्यास, ती कावीळ असू शकते. यकृताचं कार्य मंदावल्यास बिलीरुबिन नावाचे पिगमेंट शरीरात साचतं आणि त्यामुळे त्वचेत पिवळसरपणा जाणवतो.

लघवीचा रंग गडद होणं

लघवीचा रंग बदलणं हे देखील यकृताच्या समस्येचं एक लक्षण मानलं जातं. यामध्ये गडद पिवळसर, अंबर रंगाची किंवा तपकिरी लघवी होणं हे देखील यकृताच्या समस्येचं लक्षण आहे. मात्र अनेकदा हा बदल हायड्रेशन नीट असल्याचं दिसून येतं.

Liver damage Early symptoms
Symptoms of Stomach Ulcer : पोटात गाठ झाल्यावर सुरुवातीला दिसतात हे 4 मोठे बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

शौचाच्या रंगात बदल

लघवीप्रमाणे शौचाच्या रंगातील बदल देखील लिव्हरच्या समस्यांचं कारण असू शकतो. जर शौचाचा रंग फिकट, मातीसारखा, करडा असेल, तर यकृतातून पित्त निर्माण कमी झालेलं असू शकते. तर काळसर किंवा खूप गडद शौच इंटरनल रक्तस्रावाचे लक्षण असू शकतं.

Liver damage Early symptoms
Brain Tumor Early Symptoms : ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये शरीरात दिसतात हे 6 मोठे बदल; लक्षण ओखळून लगेच डॉक्टरकडे जा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com