Dhanshri Shintre
सकाळी शारीरिक स्वच्छता झाल्यावर शरीराला उर्जेची गरज भासते आणि त्यामुळे आपल्याला जोरात भूक लागते.
सकाळची कितीही घाई असली तरी नाश्ता करणं गरजेचं, पोट भरलं की कामात लक्ष केंद्रीत होतं.
रोजच्या नाश्त्यासाठी नवीन काय करायचं, हा प्रश्न सर्वांना पडतो. रोजचेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.
मग वेळ वाचवणारे, झटपट तयार होणारे आणि आरोग्यदायी असे काही खास नाश्त्याचे पर्याय पाहूया.
रव्याचा शिरा आणि उपमा ठरलेले असले तरी रव्याचा ढोकळा हा वेगळा, चवदार आणि झटपट तयार होणारा पर्याय नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा.
दही आणि तांदूळ हे दोन्ही पोषणमूल्यांनी भरलेले असल्याने त्यांचा नाश्त्यात समावेश केल्यास आरोग्यदायी आणि पोटभरीचा पर्याय ठरतो.
हे डोसे पौष्टिक असून सगळ्यांना आवडतात; दही, चटणी किंवा सॉसबरोबर खूपच चवदार लागतात आणि पचन देखील सहज होते.
भाज्या आणि गव्हामुळे हा दलिया पोषणमूल्यांनी भरलेला असून चवीलाही भारी लागतो, म्हणून तो उत्तम नाश्ता ठरतो.
तुपासोबत गरम थालिपीठ दह्यासह दिल्यास भन्नाट लागते. विविध धान्यांची पीठं वापरल्यामुळे हा नाश्ता स्वादिष्ट तर आहेच, पण पौष्टिकही आहे.