Dhanshri Shintre
वजन घटवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अंड्याच्या 5 पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी तुम्ही आजच ट्राय करून पाहा.
फक्त काही घटकांत तयार होणारा स्क्रॅम्बल्ड एग्ज हा जलद आणि प्रथिनेयुक्त नाश्ता आहे. तेल किंवा लोणीचा वापर मर्यादित ठेवा.
उकडलेल्या अंड्याने बनवलेले सँडविच हा सहज व आरोग्यदायी नाश्ता आहे. त्यात काळी मिरी आणि मीठ घालून चवीनुसार खाल्ले जाते.
बहुतेकांना आवडणारे ऑम्लेट बनवण्यासाठी अंडी फोडून त्यात मसाले व भाज्या मिसळा, फेटून पॅनमध्ये ओता – झटपट आणि पौष्टिक नाश्ता तयार आहे.
टोमॅटो-कांद्याच्या ग्रेव्हीत शिजवलेली अंडा करी ही पारंपरिक व चवदार डिश आहे. उकडलेले अंडे यामुळे हे जेवण प्रथिनेयुक्त आणि समाधानकारक ठरते.
सहजपणे बनणारे, भरपूर प्रथिने आणि कमी कॅलरीयुक्त. सकाळी 2 उकडलेली अंडी हे परफेक्ट प्रोटीन ब्रेकफास्ट.
भरपूर भाज्यांसोबत अंड्याची भुर्जी तयार करा. फायबर आणि प्रथिनांनी भरलेला शरीरासाठी हेल्दी पर्याय आहे.
गरम पाण्यात अंड्याचा थर सोडून बनवलेले सूप हलकं, गरम आणि वजन कमी करण्यासाठी परफेक्ट आहे.