Dhanshri Shintre
भारतीय खाद्यसंस्कृतीत चवीला प्राधान्य दिले जाते. मात्र शरीर आणि मनाच्या विकासासाठी चविष्ट तसेच पौष्टिक आहार घेणं तितकंच आवश्यक आहे.
काही पदार्थ असे आहेत जे अवघ्या १० मिनिटांत तयार होतात आणि खाल्ल्यावर आरोग्याला फायदेशीर ठरतात. जाणून घ्या असे झटपट पर्याय.
केळी, दही, दूध आणि मध वापरुन १० मिनिटांत तयार करा मलाईदार केळी योगर्ट स्मूदी, वरुन काजू घालून बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता.
पोहे, कांदा, मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून 10 मिनिटांत बनवा फायबरयुक्त पौष्टिक नाश्ता, जो चवीलाही आणि आरोग्यालाही उत्तम.
बेसन, लिंबू, हळद आणि ईनो घालून काही मिनिटांत बनवा फुगिर व लुसलुशीत ढोकला, हा स्वादिष्ट पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतो.
बेसन, कांदा, तिखट आणि मीठ मिसळून पीठ तयार करा, तव्यावर शेकून बनवा झटपट चविष्ट पदार्थ, जो चपातीसोबत किंवा असाही खाता येतो.
डाळी, भाज्यांचे मिश्रण वापरून सहज बनवा उत्तम, कांदा, टोमॅटो, मिरची घालून स्वाद वाढवा. नारळाच्या चटणीसह खमंग नाश्त्याचा आस्वाद घ्या.
मैदा, अंडी, दूध, साखर यांचे मिश्रण फेटून 10 मिनिटांत बनवा मुलांचा आवडता नाश्ता पॅनकेक, वर फळे टाकून स्वाद आणखी वाढवा.
उडीद डाळ, तांदूळ आणि मसाल्यांचे मिश्रण वापरून बनवा चवदार दक्षिण भारतीय डोसा, सांभार आणि बटाट्याच्या भाजीसोबत गरमागरम सर्व करा.