Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

Daily Fruits to Support Kidney Function : मूत्रपिंडासाठी फायदेशीर ६ फळांचा आहारात समावेश करा. यांमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स किडनीसाठी वरदान ठरू शकतात.
Include These 6 Super Fruits in Your Diet for Better Kidney Health Naturally
Include These 6 Super Fruits in Your Diet for Better Kidney Health NaturallyFreepik
Published On

मूत्रपिंड हे आपल्या शरिराच्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. म्हणूनच त्याचे निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे. अशात वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीत अस्वस्थ खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा थेट परिणाम आपल्या मूत्रपिंडावर होतो. यामुळे योग्य काळजी न घेतल्यास मूत्रपिंडाशी संबंधीत अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. पण तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात काही फळांचा समावेश केल्यास यापासून वाचू शकता.

Include These 6 Super Fruits in Your Diet for Better Kidney Health Naturally
cholesterol control : कोलेस्ट्रोल राहिल नियंत्रित आणि वजन होईल झटाझट कमी, डाएटमध्ये करा या एका धान्याचा समावेश

अनेकजण उत्तम आरोग्यासाठी डाएटिंग करत असतात. तुम्ही तुमच्या डाएटिंगमध्ये इतर आहारांसह सफरचंद, बेरी, द्राक्षे यांसारख्या फळांचा समावेश केल्यास ते मूत्रपिंडासाठी एक आरोग्यदायी वरदान ठरू शकतात. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे कोलेस्टेरॉल आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी यांसारख्या फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मूत्रपिंडाचे संरक्षण करतात.

द्राक्षेही मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. यामध्ये रेसवेराट्रोल असते जे हृदय आणि मूत्रपिंडाला नैसर्गिक आरोग्य प्रदान करते. क्रॅमबेरी हे फळ मूत्रपिंडाला कोणतेही संसर्ग होण्यापासून वाचवते. पीच हे फळ अ आणि क जीवनसत्त्वांनी भरपूर असते जे पचनसंस्था सुधारतात. हे फळ मूत्रपिंडाच्या रूग्णांसाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. मुख्यतः या सर्व फळांमध्ये पोटॅशियमची पातळी खुपच कमी असते. मूत्रपिंडाच्या रूग्णांसाठी पोटॅशियमयुक्त आहार घेणे धोक्याचे ठरू शकते.

Include These 6 Super Fruits in Your Diet for Better Kidney Health Naturally
Guava For Health : प्रत्येक महिलेने खायला हवे हे एक फळ, त्वचा तर चमकदार होईलच रोगप्रतिकार शक्तीही वाढेल

कारण निकामी झालेले मूत्रपिंड रक्तातून पोटॅशियम काढून टाकण्याचे काम करू शकत नाही. रक्तात पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास हायपरक्लेमिया होण्याची शक्यता असते. ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे, स्नायूंना पेटके येणे आणि हृदयांच्या ठोक्यातील अनियमितता यांसारख्या धोकादायक समस्या उद्भवू शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. यासाठी तुमच्या आहारात योग्य बदल करणे अधिक महत्त्वाचे आहे.

Include These 6 Super Fruits in Your Diet for Better Kidney Health Naturally
Water Toxicity : अति प्रमाणात पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी विष, वाचा

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com