Priya - Umesh : 'हे काय नवीन?'; प्रिया बापट अन् उमेश कामत चाळीशीत करणार 'ही' गोष्ट, VIDEO शेअर करत दिली माहिती

Priya Bapat- umesh kamat Video : मराठीतील सर्वांचे लाडके कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी चाहत्यांना नवीन सरप्राइज दिले आहे. ज्याचा एक खास व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
Priya Bapat- umesh kamat Video
Priya - Umeshsaam tv
Published On
Summary

प्रिया बापट आणि उमेश कामत हे प्रेक्षकांचे लाडके कपल आहे.

प्रिया आणि उमेशने चाहत्यांना खास सरप्राइज दिले आहे.

वयाच्या 40 व्या वर्षी दोघे एक भन्नाट गोष्ट करणार आहेत.

लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटक यांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच आपल्या अभिनयाने त्यांनी मराठीसोबत हिंदी मनोरंजन विश्व देखील गाजवले आहे. ही दोघे कायम एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. अलिकडेच दोघे 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता प्रिया आणि उमेश वयाच्या ४०व्या वर्षी एक खास गोष्ट करणार आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

प्रेक्षकांची लाडकी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा नव्या-कोऱ्या मराठी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रिया-उमेशच्या नवीन भन्नाट वेब सीरिजचे नाव 'हे काय नवीन?' असे आहे. 'हे काय नवीन ?' सीरिजमध्ये प्रिया बापट रमाची भूमिका साकारणार आहे. तर उमेश कामतच्या पात्राचे नाव आदित्य आहे. ट्रेलरच्या पोस्टला खूप खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येतेच जेव्हा प्रश्न पडतो की आता पुढे काय?"

'हे काय नवीन?' या वेब सीरिजमध्ये प्रिया-उमेशचे लग्न झाले आहे. जवळपास त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झालेली दाखवली आहेत. त्यांचे आयुष्य चांगले, सुरळीत चालू आहे. स्वतःचे घर, नोकरी आणि सुखी संसार सुरू आहे. मात्र तेव्हाच गोष्टीत मोठा ट्विस्ट येतो. जवळपास 40 व्या वर्षी रमा कामातून ब्रेक घेऊन स्वतःचा एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेते आणि येथून खऱ्या कथेला सुरूवात होते. आता ही गोष्टी कुठे जाऊन पोहचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'हे काय नवीन ?' या वेब सीरिजमध्ये प्रिया-उमेशसोबत आणखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यात शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओंकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले आहे. 'हे काय नवीन ?' ही मराठी वेब सीरिज 31 मार्चपासून मराठी ZEE5 वर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या प्रिया-उमेशच्या 'आणखी काय हवं?' वेब सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आजही ही सीरिज खूप गाजते.

Priya Bapat- umesh kamat Video
'झिम्मा' चा खेळ पुन्हा रंगणार; सिद्धार्थ चांदेकर नव्या ट्रिपसाठी तयार, Jhimma 3 ची 'या' तारखेला होणार थिएटरमध्ये एन्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com